बिझनेस मॉडेल कॅनव्हास काय आहे ?
बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे एक प्रभावी स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट टूल आहे, ज्याद्वारे संपूर्ण व्यवसायाचे चित्रण एकाच दृष्टीक्षेपात करता येते. व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी गरजेचे, महत्वाचे घटक कोणते आहेत आणि ते एकत्रित कसे कार्य करतील हे ठरवण्यासाठी बिझनेस मॉडेल तयार केले जाते.
हे टूल तुम्हाला तुमच्या व्यवसायाची संपूर्ण कल्पना एका पानावर दृश्यात्मक स्वरूपात दाखवते. Alexander Osterwalder यांनी हे टूल सोप्या आणि दृश्यात्मक पद्धतीने बिझनेस मॉडेल मांडण्यासाठी विकसित केले आहे.
बिझनेस मॉडेल कॅनव्हास मध्ये ‘9 बिझनेस ब्लॉक्स’ (व्यावसायिक घटक) दिलेले आहेत जे पुढील प्रमाणे आहेत:
- Customer Segments
तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत
- Value Propositions
ग्राहकांना मिळणारे मूल्य, फायदे, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस
- Channels
ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग - Customer Relationships
ग्राहकांसोबतचे नातेसंबंध - Revenue Streams
उत्पन्नाचे स्रोत - Key Resources
आर्थिक, भौतिक आणि बौद्धिक संसाधने - Key Activities
व्यावसायिक ऍक्टिव्हिटी, हालचाली - Key Partnerships
पार्टनर्स, सप्लायर्स - Cost Structure
खर्चाचे व्यवस्थापन
बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे फक्त एक पानाचे स्ट्रॅटेजी टूल आहे, ज्यामध्ये महत्वाचे 9 बिझनेस ब्लॉक्स दिलेले आहेत. परंतु या एक पानाच्या टूल मध्ये व्यवसायातील सर्व महत्वाच्या बाबी अंतर्भूत आहेत.
या कॅनव्हासच्या मदतीने तुम्ही तुमच्या नवीन स्टार्टअप आयडिया किती सुसंगत आहे हे ठरवू शकता.
या टूलद्वारे स्टार्टअप आयडिया ला दृश्यात्मक स्वरूपात (Visual Representation) मांडता येते, ज्यामुळे आयडिया चे विश्लेषण आणि व्हॅलिडेशन करणे सुलभ होते.
तुमच्या स्टार्टअप चे बिझनेस मॉडेल बनवण्यासोबतच आइडिया व्हॅलिडेशन साठी सुद्धा बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग केला जाऊ शकतो.
हे टूल वापरून तुम्ही ग्राहकांच्या सध्याच्या आणि बदलणाऱ्या गरजा समजू शकता, आणि स्पर्धकांपेक्षा चांगले प्रॉडक्ट विकसित करू शकता. तुम्हाला आवश्यक असलेले रिसोर्सेस, पार्टनर्स आणि सप्लायर्स कोण आहेत हे समजून घेऊ शकता.
तसेच, व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येईल आणि किती उत्पन्न मिळवता येईल याचा अंदाज देखील तुम्ही या कॅनव्हासच्या मदतीने लावू शकता.
स्टार्टअप महाराष्ट्र मेम्बरशिप
स्टार्टअप फंडिंग प्रोसेस शिका
बिझनेस मॉडेल आणि फंडिंग प्रोसेस विषयी सुलभ मराठी मध्ये शिका
मेम्बर ओन्ली इव्हेंट्स
मेम्बर साठी खास आयोजित करण्यात येणाऱ्या इव्हेंट्स मध्ये सहभाग
१ वर्षभर मेंटॉर सपोर्ट मिळवा
दर आठवड्याला स्टार्टअप मेंटॉर्स सोबत भेटा आणि फंडिंग प्रोसेस शिका
50+ मीटअप नेटवर्किंग इव्हेंट्स
मेंबरशिप द्वारे स्टार्टअप महाराष्ट्र आयोजित 50 पेक्षा अधिक नेटवर्किंग इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा!
सुरु तर करा
सोबत आहोत !
स्टार्टअप महाराष्ट्र द्वारे आयोजित मीटअप इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा आणि स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी मराठी मध्ये शिका
Register for Free Membership
You have successfully Registered!