
पुणे स्टार्टअप मीटअप
तुमच्या स्टार्टअप चे प्लॅनिंग, नेटवर्किंग आणि मार्केटिंग एकाच ठिकाणी करण्याची हक्काची, विश्वासाची जागा!
✅ 2018 पासून होणारे नियमित मीटअप
✅ 75 मीटअप इव्हेन्ट चे आयोजन
✅ 4500+ स्टार्टअप फाउंडर्सची हजेरी
✅ 12,000+ रेफरल कार्ड चे वाटप
75 मीटअप द्वारे 5000+ मराठी उद्योजकांना भेटून, आम्हाला हे समजले आहे की,
१० पैकी ९
मराठी उद्योजक
त्यांचा प्लॅन आणि स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट करत नाहीत.
१० पैकी 8
मराठी उद्योजक
नेटवर्किंग करण्यावर भर देत नाहीत..
१० पैकी 7
मराठी उद्योजक
स्वतःहून आपल्या बिझनेस चे मार्केटिंग करत नाहीत…
म्हणूनच, तुम्ही पुणे स्टार्टअप मीटअप ला यायला हवं!

50 मराठी उद्योजकांसोबत वैयक्तिक भेटा!
विविध क्षेत्रातल्या 50 पेक्षा अधिक मराठी उद्योजकांसोबत वैयक्तिक भेटा, त्यांच्यासोबत व्यावसायिक नाते तयार करा

उद्योजकांसमोर तुमचा बिझनेस प्रमोट करा, लीड्स मिळवा
उपस्थित 50 मराठी उद्योजकांच्या समोर स्टेज वर येऊन आपल्या व्यवसायाचे प्रेझेंटेशन करा आणि जागेवरच रेफरल लीड्स मिळवा

एक्स्पर्ट मेंटॉर कडून स्टार्टअप प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी शिका
स्टार्टअप महाराष्ट्र चे फाउंडर तुषार पाखरे यांच्याद्वारे स्टार्टअप प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी विषयावर, मराठी भाषेत, 2 तासांचे सेशन
पुणे स्टार्टअप मीटअप का खास आहे?
4
तासांचा नेटवर्किंग इव्हेन्ट
50+
स्टार्टअप फाउंडर्सची हजेरी
300+
रेफरल कार्ड जनरेशन
कार्यक्रमाची रूपरेखा
या 4 तासांच्या मीटअपमध्ये ५० पेक्षा अधिक मराठी उद्योजकांना भेटता येते, त्यांच्यासमोर आपला बिझनेस सादर करता येतो आणि थेट ग्राहक देखील शोधता येतात

⏰ 4 to 5.30 pm
स्टार्टअप प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सेशन

⏰ 5.30 to 7 pm
बिझनेस प्रेजेंटेशन आणि रेफरल जनरेशन सेशन

⏰ 7 to 8 pm
सहभागी उद्योजकांसोबत नेटवर्किंग सेशन
मीटअप संबंधी प्रामाणिक प्रतिक्रिया
मी बरेच स्टार्टअप व्हिडीओ पाहिले होते, पण पुणे स्टार्टअप मीटअपमध्ये तुषार पाखरे सरांचं ‘बिझनेस मॉडेल सेशन’ ऐकूनच खरं स्टार्टअप समजायला लागलं. माझी स्टार्टअप आयडिया स्पष्ट झाली आणि आता आम्ही आमचे प्रॉडक्ट देखील लॉन्च करत आहोत. मीटअप माझ्यासाठी एकदम टर्निंग पॉइंट ठरला आहे!
माझी लेबर लॉ कन्सल्टंसी आहे, पण मला योग्य स्टार्टअप्सपर्यंत पोहोचता येत नव्हतं. पुणे स्टार्टअप मीटअपमध्ये नेटवर्किंग करताना मला Real startup founders भेटले आणि क्लायंट्स मिळायला सुरुवात झाली. आज माझ्या सर्वात चांगल्या लीड्स पुणे स्टार्टअप मीटअप मधूनच मिळाल्या आहेत.
माझं mothertouchtoys.in हे लाकडी खेळणी चे ईकॉमर्स स्टोअर आहे, पण सुरुवातीला विक्री होत नव्हती. पुणे स्टार्टअप मिटअपमध्ये झालेल्या Referral Generation सेशनमुळे मधून लीड्स निर्माण करू शकलो, आणि त्याच आठवड्यात मला 15+ ऑर्डर्स मिळाल्या! 🙏
मीटअप संबंधी विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न
पुणे स्टार्टअप मिटअप कोणासाठी आहे?
👉 हा कार्यक्रम २० ते ३५ वयोगटातील मराठी उद्योजक, स्टार्टअप कल्पना असलेले युवक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आहे
हा कार्यक्रम कुठे व कधी होतो?
👉 पुणे स्टार्टअप मिटअप हे ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, सेनापती बापट रोड, पुणे’ येथे दर महिन्याला आयोजित केला जातो
नाव नोंदणी कशी करायची आहे?
👉 नोंदणीसाठी स्टार्टअप महाराष्ट्र च्या वेबसाइटवर ‘मीटअप इव्हेंट्स’ या पेज वर उपलब्ध असलेला फॉर्म भरावा किंवा आमच्या ग्राहक प्रतिनिधी सोबत बोलून नोंदणी करावी
नोंदणीसाठी काही फी लागते का?
👉 होय, पुणे स्टार्टअप मिटअप साठी ₹999 इतके शुल्क भरावे लागते – जे पुणे स्टार्टअप मिटअप च्या वेन्यू आणि व्यवस्थापनासाठी खर्च केले जातात
मी अजून स्टार्टअप सुरू केलेलं नाही, तरी मी येऊ शकतो का?
👉 नक्कीच! केवळ स्टार्टअप कल्पना असलेल्या तरुणांसाठी देखील हा कार्यक्रम तितकाच उपयुक्त आहे. इथे तुम्ही शिकू शकता आणि स्टार्टअप फाउंडर्स सोबत नेटवर्किंग करू शकता
मिटअपमध्ये काय शिकायला मिळेल?
👉 स्टार्टअपची सुरुवात कशी करायची, ग्राहक कसे मिळवायचे, फंडिंग मिळवण्यासाठी काय आवश्यकता आहेत ही मूलभूत माहिती तुम्हाला या इव्हेन्ट मध्ये मिळते, स्टार्टअप महाराष्ट्र चे फाउंडर तुषार पाखरे हे बिझनेस मॉडेल सेशन द्वारे ही माहिती उपलब्ध करून देतात
मला इतर उद्योजकांशी नेटवर्किंग करता येईल का?
👉 होय! या मीटअप मध्ये आपण सहभागी इतर फाउंडर्स, मेंटर्स आणि इन्व्हेस्टर्स यांच्याशी थेट संवाद साधू शकता आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स मिळवू शकता
मला माझ्या स्टार्टअपबद्दल बोलण्याची संधी मिळेल का?
👉 हो, रेफरल जनरेशन सेशन मध्ये सहभागी सर्व मराठी उद्योजकांना स्टेजवर स्वतःच्या स्टार्टअप संबंधी पिच करण्याची संधी दिली जाते
मी पुण्याबाहेरचा आहे, तरी मी सहभागी होऊ शकतो का?
👉 होय, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून येणाऱ्या मराठी तरुण उद्योजकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे
पुढचा मिटअप कुठे होणार आणि अपडेट्स कुठे मिळतील?
👉 पुढील इव्हेंट अपडेट्ससाठी स्टार्टअप महाराष्ट्र ची वेबसाईट नियमित तपासत रहा आणि @startupmaharashtra इंस्टाग्राम पेज फॉलो करा
पुणे स्टार्टअप मीटअप
पुणे स्टार्टअप मीटअप हा पुणे येथे प्रत्येक महिन्याला होणारा स्टार्टअप नेटवर्किंग इव्हेन्ट आहे. या मीटअप इव्हेन्ट द्वारे आपण 50+ स्टार्टअप फाउंडर्स ना भेटू शकता आणि त्यांच्या सोबत नेटवर्किंग करू शकता