Key Partnerships –

पार्टनरशिप कोणासोबत करावी?

Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क कमी करणे आणि नवीन रिसोर्सेस मिळवणे हा असतो. सप्लायर, डिस्ट्रिब्युटर आणि व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी मदत करणारे सर्व भागीदार हे तुमच्या व्यवसायाचे महत्त्वाचे घटक असतात.

बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी मुख्यतः 4 प्रकारच्या पार्टनरशिप्स केल्या जातात: एकमेकांची संसाधने वापरण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील, स्पर्धक नसलेल्या कंपन्यांमध्ये होणारी धोरणात्मक भागीदारी; मार्केटमधील नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी दोन स्पर्धक कंपन्यांमध्ये होणारी पार्टनरशिप; व्यवसायाच्या कक्षा विस्तारण्यासाठी दोन कंपन्यांमध्ये होणारे जॉइंट व्हेंचर स्वरूपाचे सहकार्य; आणि व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी सप्लायरसोबतची भागीदारी.

व्यवसायाच्या सुरुवातीला सर्व रिसोर्सेस स्वतः उपलब्ध करणे खर्चिक असल्याने, अशा व्यवसाय वाढीसाठी लागणारे महत्त्वाच्या रिसोर्सेस चा लाभ पार्टनरशिपद्वारे घेता येतो. योग्य धोरण आखून पार्टनरशिप्सचा तयार केल्या तर त्याचा अधिकाधिक फायदा होतो. तुमच्या प्रमुख पार्टनरसोबत दीर्घकालीन, दूरदृष्टीपूर्ण व्यावसायिक संबंध निर्माण करणे महत्त्वाचे आहे.


मुख्य पार्टनर आणि सप्लायर निश्चित केल्यामुळे मराठी उद्योजकांना मिळणारे 5 प्रमुख फायदे:

  1. पार्टनरशिपमुळे नवीन रिसोर्सेस तयार करण्याचा खर्च कमी करता येतो
  2. पार्टनरच्या सहाय्याने तुमच्याकडे नसलेली कौशल्ये आणि मनुष्यबळ मिळवता येते
  3. पार्टनरच्या नेटवर्कचा वापर करून कमी वेळेत व्यवसायाचा विस्तार करता येतो
  4. योग्य पार्टनर मिळाल्याने कार्यक्षमतेत वाढ करता येते, तसेच ऑपरेशनल खर्च आणि रिस्क कमी करता येतात
  5. प्रतिष्ठित कंपन्यांशी भागीदारी केल्याने ब्रँड बिल्डिंगला मदत होते

पार्टनरशिप कोणासोबत करायची हे ठरवण्यासाठी हे करा:

  1. तुमचे Value Proposition डिलिव्हर करण्यासाठी कोणते पार्टनर्स आवश्यक आहेत हे शोधा
  2. पार्टनरशिपद्वारे नवीन ग्राहक मिळवता येतात का आणि Customer Acquisition Cost कमी करता येईल का हे तपासा
  3. पार्टनरशिपमुळे कोणते Key Resources उपलब्ध होतात हे तपासा
  4. पार्टनर किंवा सप्लायरने तुमच्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी करणे अपेक्षित आहे हे ठरवा
  5. पार्टनरशिप ऍग्रीमेंट तयार करा आणि पार्टनरसोबत होणारे वाद कसे टाळता येतील हे ठरवा

 

पार्टनरशिप चे 4 मुख्य प्रकार:

  1. Strategic Alliances between Non-Competitors: एकमेकांची संसाधने वापरण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील, स्पर्धक नसलेल्या कंपन्यांमध्ये होणारी धोरणात्मक भागीदारी. जसे की, टेक्नॉलॉजी कंपनी ने लॉजिस्टिक कंपनी सोबत केलेली पार्टनरशिप.  

 

  1. Coopetition: Strategic Partnerships between Competitors: मार्केटमधील नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी दोन स्पर्धक कंपन्यांमध्ये होणारी पार्टनरशिप, स्पर्धकांमधील धोरणात्मक सहकार्य. जसे की मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने मोबाईल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोबत केलेली पार्टनरशिप. 

 

  1. Joint Ventures to Develop new Businesses: नवीन व्यवसाय किंवा बाजारपेठ विकसित करण्यासाठी चालवलेला संयुक्त उपक्रम, व्यवसायाच्या कक्षा विस्तारण्यासाठी दोन कंपन्यांमध्ये होणारे जॉइंट व्हेंचर स्वरूपाचे सहकार्य. जसे की, कार मॅन्युफॅक्चर कंपनी ची टेक्नॉलॉजी कंपनी सोबत केलेली पार्टनरशिप. 

 

  1. Buyer-supplier Relationships to Assure Reliable Supplies: पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सप्लायर सोबत तयार केलेले संबंध. जसे की, रेस्टोरंट ने फार्मर प्रोड्युसर कंपनी सोबत केलेली पार्टनरशिप.

पार्टनरशिप तयार करण्यामागील 3 मुख्य उद्देश:

  • Optimization & Economy of Scale: उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्याने मिळणाऱ्या फायद्यासाठी (Economy of Scale) तयार केलेली पार्टनरशिप
  • Reduction of Risk & Uncertainty: स्पर्धात्मक परंतु अनिश्चितता असलेल्या बाजारपेठेत रिस्क कमी करण्यासाठी केलेली पार्टनरशिप 
  • Acquisition of Particular Resources & Activities: बौद्धिक संपदा, माहिती, आणि लायसेन्स यांचा लाभ घेण्यासाठी किंवा विशिष्ट ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी तयार केलेली पार्टनरशिप

बिझनेस मॉडेल वर्कशॉप

बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!

✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच

बिझनेस मॉडेल ब्लॉग

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...

read more
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions:  ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...

read more
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....

read more
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...

read more
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...

read more
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...

read more