Key Activities –
बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत
Key Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही तुमचे व्हॅल्यू प्रपोजीशन तयार करू शकता, ते प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता, आणि तुमच्या व्यवसायाचे उद्दिष्ट साधू शकता.
व्यवसाय यशस्वीरीत्या सुरु करण्यासाठी फक्त मुख्य रिसोर्सेसच नाही, तर मुख्य ऍक्टिव्हिटी ठरवणे देखील आवश्यक आहे. यात तुमच्या उत्पादने किंवा सेवा तयार करणे, त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, ग्राहकांसोबत संबंध निर्माण करणे, आणि कंपनीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रिया समाविष्ट असतात. बिझनेस मॉडेल च्या प्रकारानुसार आणि तुमच्या व्यावसायिक गरजेनुसार मुख्य ऍक्टिव्हिटी बदलत राहतात.
मुख्य ऍक्टिव्हिटी ठरवल्यामुळे उद्योजकांना त्यांच्या दैनंदिन कार्याचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्धपणे करता येते. या ऍक्टिव्हिटी को-फाउंडर्स आणि टीम मेम्बर्स आपापल्या कौशल्यानुसार वाटून घेऊ शकतात. ऑनलाईन टास्क मॅनेजमेंट टूल्स वापरून या ऍक्टिव्हिटीचा ट्रॅक ठेवणे सहज शक्य आहे.
मुख्य ऍक्टिव्हिटी निश्चित केल्यामुळे मराठी उद्योजकांना मिळणारे 5 प्रमुख फायदे:
- मुख्य ऍक्टिव्हिटी ठरवल्यामुळे, तुमच्या ग्राहकांसाठी योग्य उत्पादने बनवून ती वेळेवर पोहोचवणे शक्य होते
- योग्य ऍक्टिव्हिटी ठरवल्याने विशिष्ट ध्येयांनी प्रेरित होऊन काम करता येते, कंपनीची उप्तादनक्षमता वाढते
- मुख्य ऍक्टिव्हिटी निश्चित केल्याने दैनंदिन कामांमधील गोंधळ कमी होऊन उद्योजकांचे लक्ष ठराविक ध्येयांवर केंद्रित राहते
- ग्राहक केंद्रित ऍक्टिव्हिटी ठरवल्याने ग्राहक संबंध सुधारतात आणि आनंदी ग्राहक तयार होतात
- व्यवसाय वाढीसाठी गरजेच्या मुख्य ऍक्टिव्हिटी शोधल्याने व्यवसाय विस्ताराची दिशा स्पष्ट करता येते
योग्य व्यावसायिक ऍक्टिव्हिटी ठरवण्यासाठी हे करा:
- तुमचे Value Proposition डिलिव्हर करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत हे शोधा
- ग्राहकांपर्यंत तुमचा ब्रँड पोहोचण्यासाठी आवश्यक ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत हे शोधा
- Organization Structure तयार करा, टीम मेम्बर्स चे Roles, Responsibility आणि दैनंदिन ऍक्टिव्हिटी ठरवा
- उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी KRA (Key Result Area) आणि KPI (Key Performance Indicators) ठरवा
- तुमच्या आणि टीम मेम्बर्स च्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी चा ट्रॅक कसा ठेवणार आहेत हे पहा
ऍक्टिव्हिटी चे प्रकार:
1. Problem Solving Activities: ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि नावीन्यतापूर्ण प्रॉडक्ट बनवण्यासाठी गरजेच्या ऍक्टिव्हिटी
- Research and Market Analysis: ग्राहकांच्या समस्या आणि बाजारातील गरजा ओळखणे
- Problem Identification & Idea Validation: ग्राहकांची नेमकी समस्या ओळखून त्यावर योग्य सोल्युशन ठरवणे
- Solution Design & Prototyping: ग्राहकांचे समाधान करणारे प्रोटोटाइप (MVP – Minimum Viable Product) तयार करणे
- Customization and Personalization: ग्राहकांच्या बदलणाऱ्या गरजांनुसार प्रॉडक्ट मध्ये आवश्यक बदल करणे
- Testing & Feedback Integration: प्रॉडक्टची चाचणी घेणे, प्रॉडक्ट मध्ये केलेल्या बदलांविषयी ग्राहकांचा फीडबॅक घेणे
- Continuous Improvement and Iteration: प्रॉडक्ट सर्वोत्तम करण्यासाठी उत्पादन प्रक्रियेत सतत सुधारणा करणे
2. Production Activities: प्रॉडक्टचे डिझाईन, उत्पादन आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ऍक्टिव्हिटी
- Designing: प्रॉडक्ट चे डिझाईन तयार करणे, Product Features ठरवणे
- Making: प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करणे आणि गुणवत्तेची काळजी घेणे
- Delivering: ग्राहकांना प्रॉडक्ट योग्य वेळेत पोहोचवणे
- Customer Support: प्रॉडक्ट वापराच्या दरम्यान ग्राहकांना आवश्यक सपोर्ट देऊ करणे
3. Platform/Network Activities: बिझनेस मॉडेल प्लॅटफॉर्म-आधारित असेल तर आवश्यक ऍक्टिव्हिटी (प्लॅटफॉर्मसारखे Shaadi, Naukri, Zomato, IndiaMART)
- Platform Management: प्लॅटफॉर्म तयार करणे, मॅनेज करणे आणि आवश्यक सुधारणा करणे
- Service Provisioning: प्लॅटफॉर्मवरून सेवा पुरविण्याचे व्यवस्थापन करणे
- Platform Promotion: प्लॅटफॉर्मची प्रसिद्धी आणि प्रमोशन करणे
- Network Management: प्लॅटफॉर्मशी संलग्न सर्व भागीदारांचे नेटवर्क मॅनेज करणे आणि वाढवणे
- Compliance and Regulation: प्लॅटफॉर्मसाठी आवश्यक कायदेशीर आणि नियामक नियमांचे पालन करणे

बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!
✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच
बिझनेस मॉडेल ब्लॉग
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?
Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन
Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...