
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजना सपोर्ट
प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी 50 लाखांपर्यंत आणि सेवा/कृषी पूरक उद्योग प्रकल्पांसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज प्रस्ताव
✅ 15% ते 35% पर्यंत अनुदान
✅ संपूर्ण प्रोसेस चे मार्गदर्शन
✅ जिल्हा उद्योग केंद्र समन्वयक उपलब्ध
✅ मेंटॉरशिप सपोर्ट उपलब्ध
उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा राज्य शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम
महाराष्ट्र राज्याच्या औधोगिक धोरण 2019 अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरु झाली. राज्यातील सूक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर झालेली आहे.
राज्यातील युवक/युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्या द्वारे ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या अर्थ सहाय्यातुन प्रकल्प उभारण्यास हातभार लावणे.
पात्र व्यवसाय
सेवा उद्योग/कृषी पूरक तसेच उत्पादन प्रकारचे उद्योग/व्यवसाय पात्र
वय मर्यादा
वय मर्यादा 18 ते 45 वर्ष, विशेष प्रवर्गासाठी 5 वर्ष शिथिल
प्रकल्प मर्यादा
रु. ५० लाखांपर्यंतचे प्रकल्प योजनेअंतर्गत प्राप्त
अनुदान
राज्य शासनाचे मार्जिन मनी अनुदान 15% ते 35% पर्यंत मिळते
महिला अर्जदार
महिलांसाठी योजनेचे 30% उद्दिष्ट राखीव
योजने साठी पात्रता अटी
18 ते 45 वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारे, उद्योजक होण्याचा विचार करणारे उमेदवार
रुपये 10 लाखावरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व रुपये 25 लाखावरील किमान 10 वी पास
अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या/महामंडळाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा
CMEGP योजनेद्वारे किती अनुदान मिळते?

CMEGP योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
✅ जन्म दाखला/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/वयाचा पुरावा
✅ शैक्षणिक पात्रते संबंधी कागदपत्रे/प्रमाणपत्रे
✅ फोटो
✅ पॅनकार्ड
✅ आधार कार्ड
✅ नियोजित जागेबाबतचे दस्तऐवज भाडेकरार
✅ प्रकल्प अहवाल (DPR – Detailed Project Report)
✅ जातीचे प्रमाणपत्र (SC, ST, NT, OBC प्रवर्गासाठी)
✅ विशेषे प्रवर्गासाठी पूरक प्रमाणपत्र (अपंग, अल्पसंख्याक)
✅ लोकसंखेचा दाखला
✅ स्वाक्षांकित विहित नमुन्यातील वाचनपत्र (Undertaking)
CMEGP योजनेसंदर्भात विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न
CMEGP योजना काय आहे ?
👉 महाराष्ट्र राज्याच्या औधोगिक धोरण 2019 अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरु झाली. राज्यातील सूक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर झालेली आहे. CMEGP योजनेचा उद्देश हा राज्यातील युवक/युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्या द्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या अर्थ सहाय्यातुन प्रकल्प उभारण्यास हातभार लावणे हा आहे.
CMEGP योजनेअंतर्गत कोणते उद्योग सुरू करता येतात ?
👉 या योजनेअंतर्गत प्रक्रिया व निर्मिती आणि सेवा व कृषी पूरक उद्योग सुरु करता येतात. प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी 50 लाखांपर्यंत आणि सेवा/कृषी पूरक उद्योग प्रकल्पांसाठी 20 लाखांपर्यंतचे प्रकल्प या योजनेद्वारे करता येतात.
CMEGP योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे ?
👉 राज्यात स्थानिक अधिवास असलेले व किमान 18 ते 45 वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारे, उद्योजक होण्याचा विचार करणारे उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत. रुपये 10 लाखावरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व रुपये 25 लाखावरील किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या/महामंडळाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
योजनेअंतर्गत किती कर्ज मिळू शकते ?
👉 CMEGP योजनेअंतर्गत उत्पादन व निर्मिती व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत आणि सेवा व कृषीपूरक उद्योगांसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
CMEGP योजनेअंतर्गत किती अनुदान मिळू शकते?
👉CMEGP योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गास – 15% ते 25% आणि विशेष प्रवर्गास (अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक) – 25% ते 35% अनुदान मिळते.
CMEGP योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
👉 CMEGP योजनेसाठी ऑनलाइन अर्ज: https://maha-cmegp.gov.in या पोर्टलवर भरायचा आहे.
अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?
👉 CMEGP योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
– जन्म दाखला/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/वयाचा पुरावा
– शैक्षणिक पात्रते संबंधी कागदपत्रे/प्रमाणपत्रे
– फोटो
– पॅनकार्ड
– आधार कार्ड
– नियोजित उद्योग/व्यवसाय जागेबाबतचे दस्तऐवज भाडेकरार
– प्रकल्प अहवाल (DPR – Detailed Project Report)
– जातीचे प्रमाणपत्र (SC, ST, NT, OBC प्रवर्गासाठी)
– विशेषे प्रवर्गासाठी पूरक प्रमाणपत्र (अपंग/माजी सैनिक, अल्पसंख्याक)
– लोकसंखेचा दाखला
– स्वाक्षांकित विहित नमुन्यातील वाचनपत्र (Undertaking)
योजने मध्ये LOCK-IN पिरियड म्हणजे काय आहे?
👉 CMEGP योजनेअंतर्गत देण्यात येणारे राज्य शासनाचे अनुदान 3 वर्ष कालावधीपर्यंत LOCK-IN राहील. प्रकल्प यशस्वीरीत्या अंमलबजावणी झाल्याची खात्री झाल्यानंतर राज्य शासनाचे अनुदान अर्जदाराच्या बँक खात्यात वितरित होते. या 3 वर्षांच्या कालावधीला LOCK-IN पिरियड म्हणतात.
या योजनेद्वारे प्रशिक्षण दिले जाते का?
👉 हो. CMEGP योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव झालेल्या अर्जदारांसाठी निःशुल्क प्रशिक्षण दिले जाते. सदर प्रशिक्षण उत्पादन प्रवर्गातील प्रकल्पांसाठी 2 आठवडे, व सेवा, कृषी पूरक उद्योग व्यवसायासाठी 1 आठवडा मुदतीचे असेल.
योजनेसंदर्भात अधिक माहिती आणि मार्गदर्शन कुठे मिळेल?
CMEGP योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आजच स्टार्टअप महाराष्ट्र प्रतिनिधी सोबत बोला आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात करा! स्टार्टअप महाराष्ट्र द्वारे डॉक्युमेंटेशन ते अनुदान मिळेपर्यंत CMEGP योजनेच्या संपूर्ण प्रोसेस चे मार्गदर्शन दिले जाते. मराठी उद्योजकांच्या मदतीकरिता स्टार्टअप महाराष्ट्र द्वारे जिल्हा उद्योग केंद्र समन्वयक देखील उपलब्ध करून दिले जातात. अधिक माहिती साठी स्टार्टअप महाराष्ट्र प्रतिनिधी सोबत संपर्क साधा.
स्टार्टअप महाराष्ट्र कडून CMEGP योजना सपोर्ट सर्व्हिस का घ्यावी?

आम्ही CMEGP योजनेविषयी आणि प्रोसेस विषयी इत्यंभूत माहिती देतो

आम्ही उद्योजकांना 1-on-1 सपोर्ट देतो आणि संपूर्ण प्रक्रियेत मदत करतो

योजनेचे फायदे मिळाल्यानंतर आम्ही उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी मेंटॉरशिप देतो
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजना सपोर्ट
प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी 50 लाखांपर्यंत आणि सेवा/कृषी पूरक उद्योग प्रकल्पांसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज प्रस्ताव
✅ 15% ते 35% पर्यंत अनुदान
✅ संपूर्ण प्रोसेस चे मार्गदर्शन
✅ जिल्हा उद्योग केंद्र समन्वयक उपलब्ध
✅ मेंटॉरशिप सपोर्ट उपलब्ध
