बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? – भाग 3

बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून सातत्याने नवनवीन रिव्हेन्यू स्ट्रीम्स शोधा आणि भक्कम रिव्हेन्यू मॉडेल तयार करा –

बिझनेस मॉडेल तयार करताना त्यातील रिव्हेन्यू स्ट्रीम्स या बिझनेस ब्लॉक मध्ये देखील वेगवेगळे प्रयोग केले जाऊ शकतात. बदलत्या मार्केट परिस्थिती आणि ग्राहकांच्या बदलणाऱ्या आवडीनुसार नवीन सोल्युशन्स, सर्व्हिसेस तयार करून उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळवता येतात का, हे तपासा. त्यामुळे कंपनीची आर्थिक बाजू भक्कम होईल आणि दीर्घकालीन फायद्याचे रिव्हेन्यू मॉडेल तयार करता येईल.

 

  • नवीन रिव्हेन्यू स्ट्रीम्स शोधायला शिका: 

तुमच्या स्पर्धकांचे रिव्हेन्यू मॉडेल अभ्यासा आणि तुमच्या इंडस्ट्रीतील सर्वात फायदेशीर रिव्हेन्यू मॉडेल्सची माहिती मिळवा. सबस्क्रिप्शन, फ्रीमियम यांसारख्या विविध रिव्हेन्यू मॉडेल्सचा तुमच्या व्यवसायात अंतर्भाव करता येईल का, याचा शोध घ्या. ग्राहक नियमितपणे, म्हणजे दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीनंतर सेवांची खरेदी करत राहतील असे Recurring Revenue मॉडेल्स तयार करता येतात का, हे पाहा.

 

  • व्यवसायाला चिरंतन चालवेल अशी मुख्य रिव्हेन्यू स्ट्रीम पक्की करा:

तुमच्या व्यावसायिक उद्दिष्टांना आणि आर्थिक लक्ष्यांना पूर्ण करू शकेल असा किमान एक मुख्य आर्थिक स्रोत तयार करा. ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेऊन तुमच्यासाठी फायदेशीर आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असे कोणते सेल्स आणि डिस्ट्रिब्युशन चॅनेल्स जास्त प्रभावी आहेत, हे तपासा. यामुळे तुमचा मुख्य आर्थिक स्रोत शोधणे आणि विकसित करणे सोपे होईल.

 

  • व्यवसाय स्केल करण्यासाठी मजबूत फायनान्शिअल मॉडेल विकसित करा:

व्यवसायाला स्थैर्य मिळवण्यासाठी उद्योजकाने व्यावसायिक आणि आर्थिक बाजू समजून घेणे अत्यावश्यक आहे. उत्पन्न मिळवण्याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि परिणामी व्यवसाय ठप्प होऊ शकतो. त्यामुळे, योग्य आर्थिक नियोजन करून व्यवसाय करणे आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायातील उत्पन्नाच्या सर्व शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी ‘Revenue Streams’ हा बिझनेस मॉडेल कॅनव्हासमधील महत्वाचा ब्लॉक उपयोगी ठरतो. उत्पन्नाचे विविध स्त्रोत शोधून त्यांचे योग्य नियोजन केल्यास कंपनीला भविष्यात स्केलेबल फायनान्शिअल मॉडेल तयार करणे सोपे जाईल

पुणे स्टार्टअप मीटअप

पुणे स्टार्टअप मीटअप हा पुणे येथे प्रत्येक महिन्याला होणारा स्टार्टअप नेटवर्किंग इव्हेन्ट आहे. या मीटअप इव्हेन्ट द्वारे आपण 50+ स्टार्टअप फाउंडर्स ना भेटू शकता आणि त्यांच्या सोबत नेटवर्किंग करू शकता

75

मीटअप इव्हेन्ट चे आयोजन

4500+

मराठी फाउंडर्स कम्युनिटी

 12,000+

रेफरल कार्ड चे वाटप