बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? – भाग 1

बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून मार्केटमधील तुमच्या क्षेत्रातील यशस्वी कंपनींचे आणि स्पर्धकांचे बिझनेस मॉडेल मॅप करा –
मार्केटमधील वर्तमान स्थितीचा अभ्यास करून तुमचे मुख्य स्पर्धक कोण आहेत हे ठरवा. बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा वापर करून त्यांच्या बिझनेस मॉडेलचे विश्लेषण करा. स्पर्धक ग्राहकांच्या कोणत्या गरजा पूर्ण करण्यात कमी पडत आहेत ते शोधा आणि त्यानुसार तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये सुधारणा करा.
- कॉम्पिटिटर रिसर्च करा:
बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा उपयोग करून तुमचे मुख्य स्पर्धक कोणत्या ग्राहकांना टार्गेट करत आहेत, त्यांना कोणते व्हॅल्यू प्रपोजीशन देत आहेत, आणि प्रॉडक्ट्स कोणत्या चॅनेल्सद्वारे पोहोचवतात हे समजून घ्या. त्यांच्या बिझनेस मॉडेलचे सखोल विश्लेषण करा.
- मार्केटमधील गॅप शोधा:
स्पर्धक सध्या कुठे कमी पडत आहेत ते शोधा. ग्राहक कोणत्या गोष्टी शोधत आहेत जे तुमचे स्पर्धक देत नाहीत हे ओळखा, हे तुम्हाला मार्केटमधील गॅप दर्शवेल.
- ग्राहकांच्या गरजा समजून घ्या:
सर्व्हे, इंटरव्यू आणि प्रत्यक्ष ग्राहकांच्या भेटी घेऊन स्पर्धकांच्या प्रॉडक्टच्या वापराबद्दल माहिती मिळवा. ग्राहक स्पर्धकांच्या प्रॉडक्टसंबंधी नाखूष आहेत का, त्यांच्या कोणत्या तक्रारी आहेत हे विचारा. ग्राहकांच्या प्रतिक्रिया सर्व्हेच्या स्वरूपात डॉक्युमेंट करा आणि यावरून तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये इनोव्हेशन करण्याच्या संधी तपासा.
पुणे स्टार्टअप मीटअप
पुणे स्टार्टअप मीटअप हा पुणे येथे प्रत्येक महिन्याला होणारा स्टार्टअप नेटवर्किंग इव्हेन्ट आहे. या मीटअप इव्हेन्ट द्वारे आपण 50+ स्टार्टअप फाउंडर्स ना भेटू शकता आणि त्यांच्या सोबत नेटवर्किंग करू शकता