बिझनेस मॉडेल कॅनव्हास

तयार करण्याची योग्य प्रोसेस

1. बिझनेस मॉडेल तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करा

बिझनेस मॉडेल कॅनव्हास तयार करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट असले तर उद्योजकांचा वेळ अधिक सार्थकी लागतो. बिझनेस मॉडेल बनवण्याचे मुख्य उद्देश पुढीलप्रमाणे असू शकतात:

  • नवीन स्टार्टअप आइडियाचे व्हॅलिडेशन करणे आणि त्याची व्यावहारिकता समजून घेणे.
  • नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी सर्वोत्तम स्ट्रॅटेजी ठरवणे.
  • सध्याच्या बिझनेस सुधारणे आणि नवीन बिझनेस मॉडेल तयार करणे.
  • स्टार्टअप फाउंडरला व्यवसायाविषयी स्पष्टता मिळवून देणे.
  • स्टार्टअप फंडिंग मिळवण्याची तयारी करणे.

उद्दिष्ट स्पष्ट असल्यास, बिझनेस मॉडेल कॅनव्हास बनवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पार पाडता येते.

2. विविध कौशल्य असलेली Brainstorming टीम असेम्बल करा

बिझनेस मॉडेल कॅनव्हास अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी, विविध क्षेत्रांची जाण असलेले आणि विविध कौशल्य असलेले टीम मेंबर्स ग्रुप डिस्कशनसाठी एकत्र आणा. यामुळे व्यवसायाच्या विविध पैलूंचा विचार करता येतो. तुमचा बिझनेस मॉडेल कॅनव्हास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या को-फाऊंडरसोबतच सगळ्या टीम मेंबर्सचा देखील उपयोग करू शकता. व्यवसायाची जाण असलेल्या तुमच्या मित्र किंवा मेंटॉर्ससोबतही तुम्ही कॅनव्हास तयार करू शकता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बिझनेस मॉडेल कॅनव्हास बनवल्यास, त्याचे व्हॅलिडेशन तुमच्याकडून होणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा.

3. या क्रमाने कॅनव्हास भरायला सुरुवात करा

1. Customer Segments: तुमचे टार्गेट ग्राहक समूह कोण आहेत हे शोधा, ग्राहक समूहांचे निकष, गरजा, आणि वैशिष्ट्ये समजून घ्या.

2. Value Proposition: तुमचे प्रॉडक्ट/सेवा ग्राहकांच्या कोणत्या समस्यांचे समाधान करतात, आणि ग्राहक समूहासाठी तुम्ही कोणते विशेष मूल्य देणार आहात ते ठरवा.

3. Channels: तुमचे Value Proposition ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणते आहेत ते ओळखा.

4. Customer Relationships: ग्राहकांशी कोणत्या पद्धतीने संवाद साधणार आहात, आणि ग्राहक समूहासोबत कोणत्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत ते निश्चित करा.

5. Revenue Streams: प्रत्येक ग्राहक समूहाकडून तुम्ही उत्पन्न कसे आणि कोणत्या माध्यमातून मिळवणार आहात ते शोधा.

6. Key Resources: Value Proposition डिलिव्हर करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या रिसोर्सेसची यादी तयार करा (भौतिक, बौद्धिक, मानवी, आणि आर्थिक रिसोर्सेस).

7. Key Activities: व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटीची यादी तयार करा.

8. Key Partnerships: तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आवश्यक असलेल्या मुख्य पार्टनर्स आणि सप्लायर्स कोण आहेत ते ठरवा.

9. Cost Structure: व्यवसाय चालवण्यासाठी येणाऱ्या मुख्य खर्चांचा शोध घ्या आणि खर्च नियंत्रित करण्याचे नियोजन करा.

4. आवश्यक ते बदल, सुधारणा करण्यासाठी दर महिन्यातून एकदा कॅनव्हास रिव्ह्यू करा

बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून स्टार्टअपची स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी उपयुक्त टूल आहे. तुमच्या व्यावसायिक उद्दिष्टांना तंतोतंत जुळणारी स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हासमध्ये वारंवार बदल करणे आणि ते रिव्ह्यू व व्हॅलिडेट करणे ही सततची प्रक्रिया आहे. त्यामुळे महिन्यातून किमान एक वेळा तुमचा बिझनेस मॉडेल कॅनव्हास रिव्ह्यू करा. यासाठी तुमचा कॅनव्हास ऑफिसमध्ये मोठ्या आकारात, दर्शनी भागात भिंतीवर चिकटवा.

5. व्यवहार्यता तपासण्यासाठी बिझनेस मॉडेलचे व्हॅलिडेशन करा

कॅनव्हासला अंतिम रूप द्या. तुमच्या कॅनव्हासमधील सर्व घटक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे पाहा. त्यानंतर, प्रॉडक्ट टेस्टिंग आणि ग्राहकांचा फीडबॅक लक्षात घेऊन तुमच्या बिझनेस मॉडेलचे व्हॅलिडेशन करा, ज्यामुळे तुमच्या बिझनेस मॉडेलची व्यवहार्यता निश्चित होईल.

स्टार्टअप महाराष्ट्र मेम्बरशिप

स्टार्टअप फंडिंग प्रोसेस शिका

बिझनेस मॉडेल आणि फंडिंग प्रोसेस विषयी सुलभ मराठी मध्ये शिका

मेम्बर ओन्ली इव्हेंट्स 

मेम्बर साठी खास आयोजित करण्यात येणाऱ्या इव्हेंट्स मध्ये सहभाग

१ वर्षभर मेंटॉर सपोर्ट मिळवा

दर आठवड्याला स्टार्टअप मेंटॉर्स सोबत भेटा आणि फंडिंग प्रोसेस शिका

 50+ मीटअप नेटवर्किंग इव्हेंट्स

मेंबरशिप द्वारे स्टार्टअप महाराष्ट्र आयोजित 50 पेक्षा अधिक नेटवर्किंग इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा!

सुरु तर करा
सोबत आहोत !

स्टार्टअप महाराष्ट्र द्वारे आयोजित मीटअप इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा आणि स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी मराठी मध्ये शिका

Register for Free Membership

You have successfully Registered!