बिझनेस मॉडेल तयार केल्याने

उद्योजकांना मिळणारे मुख्य फायदे

  1. व्यावसायिक दृष्टिकोन स्पष्ट होतो आणि विचारांमध्ये सुसूत्रता येते

बिझनेस मॉडेल कॅनव्हास तुमच्या स्टार्टअपला एक स्पष्ट दृष्टीकोन देतो. Customer Segments मध्ये तुम्ही तुमच्या आदर्श ग्राहकांचा शोध घेता, आणि Value Propositions द्वारे त्यांना काय खास मूल्य देणार आहात हे स्पष्ट होते यामुळे तुम्हाला तुमच्या ग्राहक समूहाला नेमके कसे टार्गेट करायचे हे ठरवता येते. Channels आणि Customer Relationships च्या माध्यमातून तुम्ही ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे हे निश्चित करता, ज्यामुळे तुमचे प्लॅन्स अंमलात आणायला सोपे आणि Action Oriented बनतात.

  1. कृतिशील, ठोस स्टार्टअप स्ट्रॅटेजी आखता येते

बिझनेस मॉडेल कॅनव्हास तुम्हाला प्रत्यक्षात अंमलात येऊ शकणाऱ्या स्ट्रॅटेजी तयार करण्यात मदत करतो. Key Activities आणि Key Resources वर लक्ष देऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या मुख्य कामांचे आणि आवश्यक रिसोर्सेसचे प्लॅनिंग करू शकता. यामुळे तुम्हाला ठोस स्ट्रॅटेजी तयार करण्यास मदत होते आणि अडचणींवर त्वरित उपाय शोधता येतात. Revenue Streams आणि Cost Structure तुमच्या आर्थिक नियोजनाचा स्पष्ट आढावा घेतात, ज्यामुळे खर्च कमी करून आणि उत्पन्न वाढवून कार्यक्षमता सुधारणे सोपे होते.

  1. ग्राहकाच्या नेमक्या गरजा समजता येतात, ग्राहक केंद्रित दृष्टिकोन तयार होतो 

ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी Customer Segments आणि Customer Relationships बिझनेस ब्लॉक्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही ग्राहकांच्या विशिष्ट गरजा ओळखू शकता आणि त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी तयार करू शकता. Value Propositions तुम्हाला ग्राहकांसाठी त्यांच्या अपेक्षांपेक्षा जास्त मूल्य देणारे प्रॉडक्ट तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा होते आणि ते तुमच्याशी दीर्घकाळ टिकून राहतात. सोबतच Channels च्या मदतीने तुम्ही ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचता आणि त्यांचा विश्वास जिंकता.

  1. मूल्यनिर्मिती करता येते, स्पर्धकांपेक्षा वेगळा आणि आकर्षक ब्रँड तयार करता येतो

Value Proposition तुमच्या व्यवसायाला मार्केटमधील इतर स्पर्धकांपेक्षा वेगळे आणि आकर्षक बनवतो. हा ब्लॉक तुम्हाला ग्राहकांना त्यांच्या अपेक्षांपेक्षा जास्त मूल्य देण्यासाठी मदत करतो. Value Creation वापरून आणि Channels आणि Customer Relationships च्या मदतीने ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून तुम्ही ग्राहकांचे प्रॉब्लेम सोडवू शकता. यामुळे तुमचा ब्रँड मार्केटमध्ये स्पर्धेत पुढे राहतो आणि ग्राहकांमध्ये मजबूत स्थान निर्माण करतो.

  1. व्यवसायातील आर्थिक व्यवहार्यता तपासण्यास मदत होते, खर्चाचे व्यवस्थापन करता येते

बिझनेस मॉडेल कॅनव्हास तुम्हाला तुमच्या व्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यास मदत करतो. Revenue Streams द्वारे तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे स्रोत आणि Cost Structure च्या माध्यमातून खर्चाचे व्यवस्थापन स्पष्टपणे पाहू शकता. यामुळे तुम्हाला खर्च कमी करण्याचे आणि उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधता येतात. 

  1. बदलत्या बाजार परिस्थितीशी सहज जुळवून घेता येते, व्यावसायिक लवचिकता आत्मसात होते       

    Key Activities, Key Resources, आणि Key Partnerships या बिझनेस ब्लॉक्सच्या मदतीने तुम्ही बदलत्या बाजार परिस्थितीशी सहज जुळवून घेऊ शकता. बिझनेस मॉडेल तयार केल्यामुळे तुम्ही नवीन व्यावसायिक आव्हानांचा सामना लवचिकतेने करू शकता आणि विविध प्रतिकूल परिस्थितींमध्ये योग्य उपाय शोधू शकता. यामुळे तुमचा व्यवसाय संकटातही टिकून राहतो आणि नवीन संधी तयार करत राहतो.

     

  2. मार्केट मधील स्पर्धेत पुढे राहण्याचे मार्ग शोधू शकता                                                             

    Value Propositions आणि Key Partnerships च्या मदतीने तुम्ही स्पर्धेत पुढे राहण्याचे मार्ग शोधू शकता. ग्राहकांच्या नेमक्या गरजा समजून घेऊन, त्यानुसार विशेष आणि आकर्षक ऑफर तयार करून तुम्ही ग्राहकांचे लक्ष वेधून घेऊ शकता. Customer Segments आणि Customer Relationships च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाचे वेगळेपण ठळकपणे मांडू शकता, ज्यामुळे तुमचा ब्रँड बाजारातील इतर स्पर्धकांपेक्षा पुढे राहतो.

     

  3. ग्राहकांसोबत दीर्घकालीन आणि फायदेशीर संबंध निर्माण करण्यास मदत होते

    Customer Relationship ब्लॉक तुम्हाला ग्राहकांसोबत दीर्घकालीन आणि फायदेशीर संबंध निर्माण करण्यात मदत करतो. ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधल्याने ते तुमच्याशी निष्ठेने जोडलेले राहतात. Customer Relationship चांगले केल्यास ग्राहकांचा विश्वास आणि तुमचा व्यवसाय वाढतो.

  4. नाविन्यपूर्ण कल्पना, उत्पादने किंवा सेवा तयार करू शकता

बिझनेस मॉडेल कॅनव्हासच्या मदतीने तुम्ही नाविन्यपूर्ण कल्पना, उत्पादने किंवा सेवांचा शोध घेऊ शकता. Key Activities आणि Key Partnerships च्या सहाय्याने, तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञान किंवा कार्यप्रणाली समाविष्ट करू शकता. हे नाविन्यपूर्ण दृष्टिकोन तुमच्या व्यवसायाला सतत प्रगतीची दिशा देतात, ज्यामुळे  तुम्हाला नव्या संधी मिळण्यास मदत होते. यामुळे तुमचा व्यवसाय काळानुसार विकसित होतो आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देत बाजारात टिकून राहतो.

  1. गुंतवणूकदारांचा तुमच्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो

    बिझनेस मॉडेल तयार केल्याने गुंतवणूकदारांचा तुमच्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो. Revenue Streams आणि Cost Structure च्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूकदारांना तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक स्थैर्याचा आणि नफ्याच्या क्षमतेचा ठोस अंदाज देऊ शकता. Value Propositions च्या मदतीने तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची बाजारातील स्पर्धात्मकता आणि यशस्वी होण्याची शक्यता स्पष्ट होते. यामुळे गुंतवणूकदारांचा तुमच्यावर विश्वास वाढतो आणि गुंतवणुकीसाठी अधिक संधी निर्माण होतात.

स्टार्टअप महाराष्ट्र मेम्बरशिप

स्टार्टअप फंडिंग प्रोसेस शिका

बिझनेस मॉडेल आणि फंडिंग प्रोसेस विषयी सुलभ मराठी मध्ये शिका

मेम्बर ओन्ली इव्हेंट्स 

मेम्बर साठी खास आयोजित करण्यात येणाऱ्या इव्हेंट्स मध्ये सहभाग

१ वर्षभर मेंटॉर सपोर्ट मिळवा

दर आठवड्याला स्टार्टअप मेंटॉर्स सोबत भेटा आणि फंडिंग प्रोसेस शिका

 50+ मीटअप नेटवर्किंग इव्हेंट्स

मेंबरशिप द्वारे स्टार्टअप महाराष्ट्र आयोजित 50 पेक्षा अधिक नेटवर्किंग इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा!

सुरु तर करा
सोबत आहोत !

स्टार्टअप महाराष्ट्र द्वारे आयोजित मीटअप इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा आणि स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी मराठी मध्ये शिका

Register for Free Membership

You have successfully Registered!