स्टार्टअप महाराष्ट्र विषयी
पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांचा सर्वात विश्वासू स्टार्टअप प्लॅटफॉर्म!
स्टार्टअप महाराष्ट्र हा मराठी तरुणांच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी कार्यरत उपक्रम आहे. स्टार्टअप सुरु करण्याची स्वप्ने बघणाऱ्या हजारो मराठी तरुणांना सोबत जोडताना आम्ही महाराष्ट्रधर्म जागवत आहोत आणि अभिमानाने नवतरुण मराठी उद्योजकांच्या पिढ्या घडवत आहोत.
मराठी उद्योजकांसाठी दर महिन्याला नेटवर्किंग मीटअप इव्हेंट्स आयोजित करणे, स्टार्टअप विषयीचे इत्यंभूत ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करून देणे, बिझनेस मॉडेल कॅनव्हास आणि स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी सखोल माहिती ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणे, विविध इंडस्ट्रीजसाठी स्टार्टअप मेंटॉर्स उपलब्ध करून देणे, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे स्टार्टअप महाराष्ट्र हा मराठी उद्योजकांचा विश्वासू स्टार्टअप साथीदार बनत आहे.
मराठी युवकांना उद्यमी बनवणे, त्यांची एक सशक्त कम्युनिटी तयार करणे, स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी तंत्रशुद्ध माहिती देणे, आणि त्यातून महाराष्ट्राच्या निमशहरी व ग्रामीण भागात शाश्वत रोजगार निर्माण करणे या उद्दिष्टांनी प्रेरित होऊन स्टार्टअप महाराष्ट्र टीम कार्यरत आहे.

स्टार्टअप महाराष्ट्र चे आत्तापर्यंतचे कार्य

आम्ही पुणे, कोल्हापूर आणि नाशिक शहरात 75+ पेक्षा जास्त नेटवर्किंग इव्हेन्ट चे आयोजन केले आहे

पहिल्या पिढीतील 5500+ तरुण मराठी उद्योजकांना आम्ही एका प्लॅटफॉर्म वर घेऊन आलेलो आहोत

30+ मराठी स्टार्टअप्स ना आम्ही मेंटॉरशिप आणि फंडिंग सपोर्ट देत आहोत
स्टार्टअप महाराष्ट्र लीडरशिप टीम

रोहित ललवाणी, सिनियर मेंटॉर
रोहित ललवानी हे उद्योजकता, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांचा संगम साधत इनोव्हेशनला चालना देणारे, 18+ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेले प्रख्यात स्टार्टअप मेंटॉर आहेत. स्टार्टअप महाराष्ट्रचे सिनियर मेंटॉर म्हणून, त्यांनी मराठी उद्योजकांना बिझनेस स्ट्रॅटेजी आणि फंडिंग रेडीनेसमध्ये सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या व्यवसायिक दूरदृष्टी आणि नेटवर्किंग कौशल्यामुळे, स्टार्टअप महाराष्ट्र कम्युनिटीतील अनेक स्टार्टअप्सना इन्व्हेस्टर्स, कस्टमर्स आणि इंडस्ट्री पार्टनर्स पर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे.

तुषार पाखरे, फाउंडर
तुषार पाखरे हे मराठी तरुणांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी काम करणारे स्टार्टअप लीडर आणि इकोसिस्टम बिल्डर आहेत, पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना व्यवसाय साक्षर बनवण्यासाठी ते मागील 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. स्टार्टअप महाराष्ट्रचे संस्थापक म्हणून, ग्रामीण आणि निमशहरी महाराष्ट्रात शाश्वत रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी त्यांनी 5000 पेक्षा अधिक मराठी उद्योजकांची मजबूत आणि सकस अशी स्टार्टअप कम्युनिटी उभारली आहे.
स्टार्टअप महाराष्ट्र विषयी उद्योजकांच्या प्रतिक्रिया
मी बरेच स्टार्टअप व्हिडीओ पाहिले होते, पण पुणे स्टार्टअप मीटअपमध्ये तुषार पाखरे सरांचं ‘बिझनेस मॉडेल सेशन’ ऐकूनच खरं स्टार्टअप समजायला लागलं. माझी स्टार्टअप आयडिया स्पष्ट झाली आणि आता आम्ही आमचे प्रॉडक्ट देखील लॉन्च करत आहोत. मीटअप माझ्यासाठी एकदम टर्निंग पॉइंट ठरला आहे!
माझी लेबर लॉ कन्सल्टंसी आहे, पण मला योग्य स्टार्टअप्सपर्यंत पोहोचता येत नव्हतं. पुणे स्टार्टअप मीटअपमध्ये नेटवर्किंग करताना मला Real startup founders भेटले आणि क्लायंट्स मिळायला सुरुवात झाली. आज माझ्या सर्वात चांगल्या लीड्स पुणे स्टार्टअप मीटअप मधूनच मिळाल्या आहेत.
माझं mothertouchtoys.in हे लाकडी खेळणी चे ईकॉमर्स स्टोअर आहे, पण सुरुवातीला विक्री होत नव्हती. पुणे स्टार्टअप मिटअपमध्ये झालेल्या Referral Generation सेशनमुळे मधून लीड्स निर्माण करू शकलो, आणि त्याच आठवड्यात मला 15+ ऑर्डर्स मिळाल्या! 🙏