
बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!
✅ 50+ वर्कशॉप चे आयोजन
✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच
95% स्टार्टअप पहिल्या 3 वर्षांत बंद पडतात, तुमचा त्यात नसेल याची खात्री करा,
70%
मराठी उद्योजक
कोणताही स्टार्टअप मेंटॉर शोधत नाहीत.
80%
मराठी उद्योजक
कोणतेही व्यावसायिक ध्येय निश्चित करत नाहीत..
90%
मराठी उद्योजक
त्यांचा प्लॅन आणि स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट करत नाहीत…
म्हणूनच, तुम्ही बिझनेस मॉडेल वर्कशॉप ला यायला हवं!

जगप्रसिद्ध स्टार्टअप स्ट्रॅटेजी टूल शिका
‘बिझनेस मॉडेल कॅनव्हास’ हे जगविख्यात स्टार्टअप स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग टूल शिकण्याची संधी

20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच द्वारे शिका
20 वर्ष व्यावसायिक अनुभव असलेले स्टार्टअप मेंटॉर आणि बिझनेस कोच या वर्कशॉप मध्ये शिकवतात

बिझनेस मॉडेल बनवल्यास नवीन दिशा मिळतात
बिझनेस मॉडेल तयार केल्याने व्यवसाय वाढीच्या नवीन दिशा सापडतात, विचारांत सुसूत्रता येते
बिझनेस मॉडेल वर्कशॉप ला का यावं?
8
तासांचा, पूर्ण दिवस वर्कशॉप
30+
स्टार्टअप फाउंडर्सची हजेरी
9
बिझनेस ब्लॉक्स विषयी संपूर्ण मार्गदर्शन
बिझनेस मॉडेल वर्कशॉप चा उद्देश
तरुण मराठी उद्योजकांना स्टार्टअप स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग प्रोसेस विषयी सखोल माहिती मिळावी या उद्देशातून वर्कशॉप चे आयोजन करत आहोत. या वर्कशॉपमध्ये, बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे एक पानाचे ‘स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग टूल’ शिकवले जाते. या कॅनव्हास च्या मदतीने पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना अचूक बिझनेस स्ट्रॅटेजी कशी तयार करायची हे शिकून घेता येते.

20 ते 30 वयोगटातील पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना स्टार्टअप सुरू करताना अनेक अडचणी व संभ्रमांचा सामना करावा लागतो. बिझनेस मॉडेल वर्कशॉपमुळे व्यवसाय टिकवणे आणि वाढवणे यासाठी स्पष्ट दिशा मिळते, आणि धडपडणारी वर्षे वाचतात.
वर्कशॉप मध्ये हे 9 बिझनेस ब्लॉक शिका


1. Customer Segments - तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?
✅ तुमचे टार्गेट ग्राहक समूह कोण आहेत हे शोधा, ग्राहक समूहांचे निकष, गरजा, आणि वैशिष्ट्ये समजून घ्या
2. Value Propositions - ग्राहकांना योग्य मूल्य, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस कसे द्यायचे?
✅ तुमचे प्रॉडक्ट/सेवा ग्राहकांच्या कोणत्या समस्यांचे समाधान करतात, आणि ग्राहक समूहासाठी तुम्ही कोणते विशेष मूल्य देणार आहात ते ठरवा
3. Channels - सेल्स, मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशन चे मार्ग कसे शोधायचे?
✅ तुमचे Value Proposition ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणते आहेत ते ओळखा
4. Customer Relationships - आनंदी ग्राहक कसे तयार करायचे?
✅ ग्राहकांशी कोणत्या पद्धतीने संवाद साधणार आहात, आणि ग्राहक समूहासोबत कोणत्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत ते निश्चित करा
5. Revenue Streams - उत्पन्नाचे स्रोत कसे ठरवायचे?
✅ प्रत्येक ग्राहक समूहाकडून तुम्ही उत्पन्न कसे आणि कोणत्या माध्यमातून मिळवणार आहात ते शोधा
6. Key Resources - आर्थिक, भौतिक आणि बौद्धिक संसाधने कशी मिळवायची?
✅ Value Proposition डिलिव्हर करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या रिसोर्सेसची यादी तयार करा (भौतिक, बौद्धिक, मानवी, आणि आर्थिक रिसोर्सेस)
7. Key Activities - व्यावसायिक ऍक्टिव्हिटी कशा ठरवायच्या?
✅ व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटीची यादी तयार करा
8. Key Partnerships - पार्टनर्स, सप्लायर्स कसे शोधायचे?
✅ तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आवश्यक असलेल्या मुख्य पार्टनर्स आणि सप्लायर्स कोण आहेत ते ठरवा
9. Cost Structure - खर्चाचे व्यवस्थापन कसे करायचे?
✅ व्यवसाय चालवण्यासाठी येणाऱ्या मुख्य खर्चांचा शोध घ्या आणि खर्च नियंत्रित करण्याचे नियोजन करा
या वर्कशॉप मध्ये कोण शिकवणार आहे?

रोहित ललवाणी, सिनियर मेंटॉर
रोहित ललवानी हे उद्योजकता, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांचा संगम साधत इनोव्हेशनला चालना देणारे, 18+ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेले प्रख्यात स्टार्टअप मेंटॉर आहेत. स्टार्टअप महाराष्ट्रचे सिनियर मेंटॉर म्हणून, त्यांनी मराठी उद्योजकांना बिझनेस स्ट्रॅटेजी आणि फंडिंग रेडीनेसमध्ये सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या व्यवसायिक दूरदृष्टी आणि नेटवर्किंग कौशल्यामुळे, स्टार्टअप महाराष्ट्र कम्युनिटीतील अनेक स्टार्टअप्सना इन्व्हेस्टर्स, कस्टमर्स आणि इंडस्ट्री पार्टनर्स पर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे.
“यशासाठी अपयशाचे धडे आवश्यक आहेत” या तत्त्वावर विश्वास ठेवणारे रोहित ललवानी सर, स्टार्टअप महाराष्ट्रच्या हजारो तरुण मराठी उद्योजकांसाठी दीपस्तंभ बनले आहेत. मराठी उद्योजकांना एकत्र आणणे, महाराष्ट्रात शाश्वत रोजगार निर्मिती करणारे स्टार्टअप्स तयार करणे आणि त्यातून समाजात सकारात्मक बदल घडवणे यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

तुषार पाखरे, फाउंडर
तुषार पाखरे हे मराठी तरुणांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी काम करणारे स्टार्टअप लीडर आणि इकोसिस्टम बिल्डर आहेत, पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना व्यवसाय साक्षर बनवण्यासाठी ते मागील 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. स्टार्टअप महाराष्ट्रचे संस्थापक म्हणून, ग्रामीण आणि निमशहरी महाराष्ट्रात शाश्वत रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी त्यांनी 5000 पेक्षा अधिक मराठी उद्योजकांची मजबूत आणि सकस अशी स्टार्टअप कम्युनिटी उभारली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये 12+ वर्षांचा अनुभव असलेले तुषार पाखरे यांनी हजारो मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना दैनंदिन व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी, फंडिंग मिळवण्यासाठी आणि शाश्वत व्यवसाय निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. मराठी व्यावसायिकांना मदत करण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीमुळे, ते महाराष्ट्रातील स्टार्टअप विश्वातील एक विश्वासार्ह मार्गदर्शक बनले आहेत.
वर्कशॉप संबंधी प्रतिक्रिया
मी बिझनेस मॉडेलबद्दल थोडंफार वाचलं होतं, पण रोहित लालवाणी सरांनी ‘९ बिझनेस ब्लॉक्स’ इतक्या संयमानं समजावून सांगितले की अख्खं चित्र डोळ्यांसमोर आलं. प्रत्येक गोष्ट किती महत्वाची आहे हे खूप सहज समजलं. हा वर्कशॉप माझ्यासाठी एकदम डोळे उघडणारा ठरला!
आम्हाला प्रॉडक्ट लॉन्च करायचं होतं, पण कोणासाठी आणि कसं याबद्दल गोंधळ होता. या वर्कशॉपमुळे योग्य कस्टमर सेगमेंट आणि योग्य व्हॅल्यू प्रपोझिशन कशी ठरवायची हे नीट समजलं. आता प्लॅन तयार आहे आणि लवकरच लॉन्च करणार आहोत!
माझ्या डोक्यात आयडिया होती, पण दिशा नव्हती. या वर्कशॉपमुळे माझे व्हिजन क्लिअर झाले आहे आणि आता प्रत्येक गोष्टीचं नीट प्लॅनिंग करता येईल असं वाटतंय. पुढे काम करताना मी नेहमी बिझनेस मॉडेल कॅनव्हास वापरणार आहे. धन्यवाद रोहित सर आणि स्टार्टअप महाराष्ट्र टीम.
वर्कशॉप संबंधी विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न
बिझनेस मॉडेल वर्कशॉप कोणासाठी आहे?
👉 हा वर्कशॉप २० ते ३५ वयोगटातील मराठी उद्योजक, स्टार्टअप सुरू करायचं ठरवलेले युवक, स्टुडंट्स किंवा स्टार्टअपच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्यांसाठी आहे
वर्कशॉपमध्ये कोण कोणते विषय शिकवले जातात?
👉 बिझनेस मॉडेल कॅनव्हास (BMC) मधील ९ महत्त्वाचे ब्लॉक्स – म्हणजे ग्राहक, प्रॉडक्ट, चॅनेल्स, उत्पनाचे मार्ग, या संदर्भात सखोल मार्गदर्शन केलं जातं. यासोबतच त्याचा प्रत्यक्षात स्टार्टअपसाठी कसा वापर करायचा ते पण शिकवलं जातं
वर्कशॉपचं स्वरूप कसं असतं - थिअरी की प्रॅक्टिकल?
👉 वर्कशॉप थोडं थिअरी आणि जास्त प्रॅक्टिकल आहे. सुरुवातीला थोडकं बेसिक समजावून दिलं जातं आणि मग स्वतःच्या आयडियावर किंवा केस स्टडीवर प्रत्यक्षात काम करायला लावलं जातं
वर्कशॉपमध्ये कोण शिकवणार आहे?
👉 वर्कशॉप रोहित ललवाणी सर घेणार आहेत, ज्यांना स्टार्टअप आणि ट्रेनिंग क्षेत्रात १८+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो उद्योजकांना गाइड केलं आहे. त्यांचं शिकवण्याची पद्धत खूप सोपी, उदाहरणांवर आधारित आणि प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे शिकणं खूप सहज आणि मजेशीर वाटतं
वर्कशॉपसाठी काही पूर्वतयारी लागते का?
👉 नाही. कोणतीही तयारी लागणार नाही. फक्त तुमच्याकडे जर एखादी स्टार्टअप आयडिया असेल तर तिचा थोडक्यात विचार करून या, म्हणजे वर्कशॉपमध्ये अधिक फायदा होईल
वर्कशॉपमध्ये ग्रुपमध्ये काम करायला मिळेल का?
👉 होय, काही अॅक्टिव्हिटीज ग्रुपमध्ये असतात. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करता येते, नवीन आयडिया समजतात आणि चांगलं नेटवर्किंग होतं
वर्कशॉपनंतर काही सपोर्ट मिळतो का?
👉 वर्कशॉप संपल्यानंतर तुम्ही जर पुढे काम करत असाल तर अशा निवडक स्टार्टअप्सना मेंटर्सशी संपर्क ठेवण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, वॉट्सअॅप ग्रुप्समध्ये अपडेट्स व गाइडन्स मिळतं
वर्कशॉपमध्ये माझ्या आयडियावर काम करता येईल का?
👉 होय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्टार्टअप आयडियावर थेट बिझनेस मॉडेल कॅनव्हास तयार करू शकता आणि मेंटर्सकडून थेट फीडबॅकही मिळू शकतो
वर्कशॉपसाठी ऑन-द-स्पॉट नोंदणी करता येते का?
👉 शक्यतो नाही. जागा लिमिटेड असल्यामुळे आधीच ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा वर्कशॉप सुरू होण्यापूर्वीच सीट्स भरतात
वर्कशॉप विषयी अपडेट्स कुठे पाहायला मिळतील?
👉 स्टार्टअप महाराष्ट्र वेबसाइट, इंस्टाग्राम पेज आणि वॉट्सअॅप कम्युनिटीवर सगळ्या अपडेट्स आणि नोंदणीच्या लिंक दिल्या जातात. वेळोवेळी चेक करत राहणं फायद्याचं ठरेल
बिझनेस मॉडेल ब्लॉग
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा? – भाग 5
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? - भाग 5बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा स्ट्रॅटेजी टूल म्हणून उपयोग करा स्पर्धेत टिकणारं बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी बदलत्या मार्केट परिस्थितीनुसार वेळोवेळी योग्य बदल करणे आवश्यक...
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा? – भाग 4
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? - भाग 4बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून प्रोटोटाइप तयार करा आणि मार्केट टेस्ट करा बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा उपयोग करून आपण ग्राहकांसाठी योग्य प्रॉडक्ट बनवत आहोत का, हे...
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा? – भाग 3
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? - भाग 3बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून सातत्याने नवनवीन रिव्हेन्यू स्ट्रीम्स शोधा आणि भक्कम रिव्हेन्यू मॉडेल तयार करा - बिझनेस मॉडेल तयार करताना त्यातील रिव्हेन्यू...
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा? – भाग 2
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? - भाग 2 बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून बिझनेस मॉडेल मध्ये इनोव्हेशन च्या संधी शोधा आणि तुमच्या ब्रँडचे वेगळेपण सिद्ध करा बिझनेस मॉडेल कॅनव्हासमधील 9 बिझनेस ब्लॉक्सचा...
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा? – भाग 1
बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? - भाग 1बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून मार्केटमधील तुमच्या क्षेत्रातील यशस्वी कंपनींचे आणि स्पर्धकांचे बिझनेस मॉडेल मॅप करा - मार्केटमधील वर्तमान स्थितीचा अभ्यास करून...
बिझनेस मॉडेल तयार केल्याने उद्योजकांना मिळणारे मुख्य फायदे
बिझनेस मॉडेल तयार केल्याने उद्योजकांना मिळणारे मुख्य फायदे व्यावसायिक दृष्टिकोन स्पष्ट होतो आणि विचारांमध्ये सुसूत्रता येते बिझनेस मॉडेल कॅनव्हास तुमच्या स्टार्टअपला एक स्पष्ट दृष्टीकोन देतो....
बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल वर्कशॉप हा प्रत्येक महिन्याला पुण्यात होणारा प्रॅक्टिकल स्टार्टअप वर्कशॉप आहे. इथे तुम्ही बिझनेस मॉडेल कॅनव्हास शिकता, स्वतःच्या स्टार्टअप आयडियावर काम करता, आणि 30+ स्टार्टअप फाउंडर्सशी नेटवर्किंग करून योग्य दिशा मिळवता!