बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? – भाग 5

बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा स्ट्रॅटेजी टूल म्हणून उपयोग करा


स्पर्धेत टिकणारं बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी बदलत्या मार्केट परिस्थितीनुसार वेळोवेळी योग्य बदल करणे आवश्यक आहे, आणि नेमके कोणते बदल करायचे आहेत हे ठरवण्यासाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे सर्वोत्तम टूल आहे. कॅनव्हास तयार केल्याने उद्योजकांना व्यावसायिक दृष्टिकोन मिळतो, आणि हे एक स्ट्रॅटेजी टूल म्हणूनही उपयुक्त ठरते. व्यवसायातील सर्व महत्त्वाच्या बाबी एकाच दृष्टीक्षेपात समजण्यासाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा नियमितपणे रिव्ह्यू करत राहा. नवीन ग्राहक कुठे मिळू शकतात, ग्राहकांना काय वेगळं हवं आहे, आणि त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे कसं पोहोचायचं, हे कॅनव्हास वापरून शोधणं सहज शक्य आहे. 

  • योग्य स्ट्रॅटेजी आखण्यासाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा नियमित रिव्ह्यू करा:

    प्रोटोटाइप टेस्टिंग आणि ग्राहकांच्या प्रतिक्रियांचा विचार करून तुमचं बिझनेस मॉडेल कॅनव्हास मध्ये नियमित सुधार करत राहा. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि त्यातून तयार होणाऱ्या नवीन संधी ओळखण्यासाठी कस्टमर सेगमेंट्स, व्हॅल्यू प्रपोजीशन, आणि चॅनेल्स हे तीन महत्त्वाचे बिझनेस ब्लॉक्स वेळोवेळी तपासा. ग्राहकांचे सर्व्हे, अभिप्राय, आणि प्रतिक्रिया डॉक्युमेंट करा आणि याच माहितीच्या आधारावर भविष्यातील स्ट्रॅटेजी ठरवा.

  • कंपनीमध्ये इनोव्हेशनसाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा उपयोग करा:

    बिझनेस मॉडेल कॅनव्हास उद्योजकांना व्यवसायाच्या सध्यस्थिती आणि भविष्यातील व्यावसायिक संधी शोधायला मदत करतो. कॅनव्हास तयार केल्याने, व्यवसायाच्या सर्व घटकांचा एकत्रित विचार करता येतो आणि सर्वसमावेशक निर्णय घेण्यास प्रोत्साहन मिळते. कॅनव्हास हे टूल फाऊंडर आणि संपूर्ण टीमला नाविन्यपूर्ण दृष्टिकोन अंगिकारण्यासाठी प्रेरित करतो. 

 

  • बिझनेस मॉडेलचे व्हॅलिडेशन करण्यासाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हास वापरा:


    बिझनेस मॉडेल कॅनव्हासच्या मदतीने तुम्ही तुमच्या टार्गेट कस्टमर सेगमेंट्ससोबत विविध प्रयोग करू शकता. त्यांच्या गरजांनुसार कोणतं व्हॅल्यू प्रपोजीशन फायदेशीर ठरेल आणि ते कोणत्या प्रॉडक्ट/सर्व्हिससाठी पैसे देण्यास तयार आहेत हे शोधू शकता. प्रोटोटाइप तयार करून मार्केट टेस्ट केल्याने, अशा प्रयोगांच्या मदतीने तुमच्या बिझनेस मॉडेलचं व्हॅलिडेशन करणं शक्य होतं.

पुणे स्टार्टअप मीटअप

पुणे स्टार्टअप मीटअप हा पुणे येथे प्रत्येक महिन्याला होणारा स्टार्टअप नेटवर्किंग इव्हेन्ट आहे. या मीटअप इव्हेन्ट द्वारे आपण 50+ स्टार्टअप फाउंडर्स ना भेटू शकता आणि त्यांच्या सोबत नेटवर्किंग करू शकता

75

मीटअप इव्हेन्ट चे आयोजन

4500+

मराठी फाउंडर्स कम्युनिटी

 12,000+

रेफरल कार्ड चे वाटप