बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? – भाग 4
बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून प्रोटोटाइप तयार करा आणि मार्केट टेस्ट करा
बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा उपयोग करून आपण ग्राहकांसाठी योग्य प्रॉडक्ट बनवत आहोत का, हे तपासता येते. प्रॉडक्टमध्ये ग्राहकांच्या गरजा अचूकपणे सोडवणारे कोणते फीचर्स महत्वाचे आहेत, हे ओळखण्यासाठी प्रोटोटाइप तयार करून ग्राहकांसमोर टेस्ट करणे गरजेचे आहे. प्रोटोटाइप टेस्ट केल्याने अंतिम प्रॉडक्ट लॉन्च करण्यापूर्वीच व्हॅल्यू प्रपोजिशन काय असावे, हे समजते. ग्राहकांच्या मुख्य गरजा भागवणारी महत्वाची फीचर्स शोधून प्रोटोटाइप तयार करा. प्रोटोटाइप बनवणे शक्य नसल्यास, किमान तुमच्या टार्गेट कस्टमर सेगमेंटचे इंटरव्ह्यू घ्या आणि तुमचा प्रॉडक्ट त्यांच्या पसंतीस उतरतो आहे का, हे विचारा.
- प्रॉडक्ट तयार करण्यापूर्वी प्रोटोटाइप तयार करा आणि मार्केटमध्ये टेस्ट करा:
प्रोटोटाइप तयार करून, ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि मार्केटची स्थिती समजून घ्या. यामुळे आपण बनवत असलेल्या प्रॉडक्टची व्यवहार्यता तपासता येते आणि भविष्यातील अनावश्यक खर्च टाळता येतो. तसेच, हे तुमच्या प्रॉडक्टला अधिक प्रभावी बनवण्यासाठी मदत करते.
- फीडबॅक मेकॅनिझम तयार करा आणि ग्राहकांच्या सूचनांचा आदर करा:
ग्राहकांच्या गरजा आणि समस्या समजून घेतल्यास आणि त्यानुसार प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बनवल्यास कंपनीला दूरगामी फायदे मिळतात. प्रोटोटाइपद्वारे ग्राहकांच्या सूचनांनुसार प्रॉडक्टमध्ये योग्य बदल करता येतात. यासाठी, फीडबॅक मेकॅनिझम तयार करा, जो तुम्हाला नियमितपणे ग्राहकांचे अभिप्राय मिळवून देईल आणि ग्राहकांच्या त्या सूचनांचा प्रॉडक्टच्या अंतिम रूपात समावेश करता येईल.
- जास्त लोकांना येणारा साधारण प्रश्न सोडवण्याऐवजी कमी लोकांना येणारा परंतु गंभीर प्रश्न सोडवा:
प्रोटोटाइप तयार करून तुम्ही कमी लोकांना येणारा पण गंभीर प्रश्न सोडवू शकता का, याचा शोध घ्या. स्पर्धक दुर्लक्षित करत असलेल्या आणि ग्राहकांना वारंवार त्रास देणाऱ्या समस्या ओळखा आणि त्यासाठी प्रभावी सोल्युशन तयार करा. कोणते फीचर्स ग्राहकांचे प्रश्न उत्तमरीत्या सोडवतात हे शोधून त्यानुसार प्रॉडक्टला अंतिम रूप द्या.

बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!
✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच
बिझनेस मॉडेल ब्लॉग
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत
Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?
Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन
Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...