बिझनेस मॉडेल कसा बनवायचा ? – भाग 2

बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून बिझनेस मॉडेल मध्ये इनोव्हेशन च्या संधी शोधा आणि तुमच्या ब्रँडचे वेगळेपण सिद्ध करा
बिझनेस मॉडेल कॅनव्हासमधील 9 बिझनेस ब्लॉक्सचा अभ्यास करून, कॉम्पिटिशन पेक्षा चांगले आणि ग्राहकांच्या गरजा अचूकरीत्या पूर्ण करणारे व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करा. स्पर्धकांपेक्षा उत्कृष्ट, वेगळे प्रॉडक्ट तयार करून ग्राहकांच्या मनात ठसा उमटवा. बिझनेस मॉडेल ला Repeatable & Scalable बनवता येईल अशा दिशेला जाणारे इनोव्हेशन करा.
- ‘कस्टमर सेगमेंट – व्हॅल्यू प्रपोजिशन – चॅनेल्स’ यांच्या माध्यमातून प्रयोग करत नवीन संधी शोधा:
ग्राहकांचे वेगवेगळे गट तयार करून, प्रत्येक गटाच्या नेमक्या गरजांचा अभ्यास करा. त्याद्वारे त्यांच्या गरजा अचूकरीत्या सोडवणारे कोणते नवीन व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा प्रॉडक्ट्स विकसित करता येतील याचा शोध घ्या. ग्राहकांपर्यंत कोणत्या चॅनेल्सद्वारे अधिक उत्तमरीत्या पोहोचता येऊ शकते, हे नियमित तपासत रहा. ‘कस्टमर सेगमेंट – व्हॅल्यू प्रपोजिशन – चॅनेल्स’ या 3 बिझनेस ब्लॉक्समध्ये योग्य सामंजस्य ठेवत व्यावसायिक प्रयोग करत रहा आणि नवीन संधींचा शोध घ्या. - ‘रिसोर्सेस – ऍक्टिव्हिटी – पार्टनर्स’ चा योग्य उपयोग करून इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स तयार करा:
स्पर्धकांपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण आणि कमी खर्चातील ‘रिसोर्सेस’ वापरा. ग्राहकांचे प्रश्न अभिनव पद्धतीने कसे सोडवता येतील, यासाठी ‘ऍक्टिव्हिटी’ चे प्लॅनिंग करा. व्यवसायासाठी योग्य असे पार्टनर्स शोधून तुमचे कॉस्ट स्ट्रक्चर सुधारा. जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये टिकणारी, ग्राहकांना आवडणारी, आणि स्पर्धकांपेक्षा सरस अशी इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स विकसित करता येतील. - रिपीटेबल आणि स्केलेबल (Repeatable & Scalable) बिझनेस मॉडेल तयार करण्यावर भर द्या:
तुमच्या बिझनेस मॉडेलची विविध ठिकाणी, शहरांमध्ये पुनरावृत्ती (Repeatable) करणे शक्य आहे का, आणि फंडिंग मिळाल्यास व्यवसाय किमान दहा पटीनं वाढवणे (Scalable) शक्य आहे का, हे तुमचे बिझनेस मॉडेल कॅनव्हास वेळोवेळी तयार करून तपासा.
पुणे स्टार्टअप मीटअप
पुणे स्टार्टअप मीटअप हा पुणे येथे प्रत्येक महिन्याला होणारा स्टार्टअप नेटवर्किंग इव्हेन्ट आहे. या मीटअप इव्हेन्ट द्वारे आपण 50+ स्टार्टअप फाउंडर्स ना भेटू शकता आणि त्यांच्या सोबत नेटवर्किंग करू शकता