Cost Structure –
व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन
कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे भांडवल आणि खर्च. मुख्य रिसोर्सेस, ऍक्टिव्हिटी आणि पार्टनर कोण आहेत हे ठरवले की व्यवसाय उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाज बांधणे सोपे होते.
तुमचा बिझनेस मॉडेल हा जास्त ग्राहकांना कमी किमतीत प्रॉडक्ट विकणारा (Cost Driven) आहे की कमी ग्राहकांना जास्त किमतीत प्रॉडक्ट विकणारा (Value Driven) आहे, हे ठरवल्यानंतर, त्यानुसार लागणारे मुख्य खर्च ओळखता येतात. कोणते रिसोर्सेस सर्वात महाग आहेत आणि कोणते ऍक्टिव्हिटी जास्त खर्चिक आहेत, हे समजल्यावर व्यवसायातील मुख्य खर्च लक्षात येतात.
कोणत्या कस्टमर सेगमेंट पर्यंत पोहोचणे कमी खर्चिक आहे आणि कोणत्या चॅनेल्स द्वारे स्वस्तात ग्राहकांपर्यंत पोहोचता येऊ शकते याचा सातत्याने शोध घेतल्यास व्यवसायाच्या सुरुवातीला होऊ शकणाऱ्या अनिर्बंध खर्चावर लगाम घालता येऊ शकतो. खर्च आणि नफा यांचा योग्य ताळमेळ लावणे उद्योजकाच्या यशस्वी भविष्यासाठी गरजेचे आहे.
कॉस्ट स्ट्रक्चर तयार केल्याने मराठी उद्योजकांना मिळणारे 5 प्रमुख फायदे:
- कॉस्ट स्ट्रक्चर तयार केल्याने व्यवसायात होणारे मुख्य खर्च शोधता येतात, खर्चाचे नियोजन करता येते
- कॉस्ट स्ट्रक्चर बनवल्यास व्यवसायातील खर्चिक रिसोर्सेस आणि ऍक्टिव्हिटी शोधता येतात, बचत करण्याचे मार्ग मिळतात
- व्यवसायात Fixed आणि Variable Costs कोणते आहेत हे समजून येते, ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधता येतो
- खर्चाचे नियोजन केल्याने व्यवसाय किती नफा कमवू शकतो हे मोजणे सोपे होते
- खर्चाचे नियोजन केल्याने रिस्क फॅक्टर समजून येतात, कॅश-फ्लो प्लॅन करणे शक्य होते
कॉस्ट स्ट्रक्चर तयार करण्यासाठी हे करा:
- तुमचा बिझनेस मॉडेल Cost Driven आहे की Value Driven, हे ठरवा.
- तुमचे Value Proposition ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होणारे प्रमुख खर्च (Fixed & Variable Cost) ओळखा.
- कोणते चॅनेल्स सर्वाधिक खर्चिक आहेत, हे शोधा
- कोणते रिसोर्स आणि ऍक्टिव्हिटी सर्वाधिक खर्चिक आहेत, हे तपासा
- तुमच्या व्यवसायात Scale किंवा Scope वाढवून खर्च कमी करता येईल, हे तपासा
तुमचे बिझनेस मॉडेल कोणत्या प्रकारचे आहे?
Cost Driven:
या बिझनेस मॉडेलमध्ये कमी किंमतीचे Value Proposition तयार करून, जास्तीत जास्त ऑटोमेशन आणि आउटसोर्सिंग करून खर्च कमी करण्यावर भर दिला जातो
Value Driven:
या बिझनेस मॉडेलमध्ये खर्च कमी करण्याऐवजी Premium Value Creation करण्यासाठी गुंतवणुकीवर जोर दिला जातो, आणि सर्वोत्तम आणि नाविन्यपूर्ण उत्पादने/सेवा प्रदान करण्यासाठी अधिक खर्च केला
Cost Structure चे मुख्य भाग:
Fixed Costs:
उत्पादनाचे प्रमाण कमी किंवा जास्त असले तरी कायम राहणारे खर्च, जसे की, कर्मचाऱ्यांचे पगार, ऑफिसचे भाडे, मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा खर्च इत्यादी
Variable Costs:
उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलणारे खर्च, जसे की, कच्चा माल, पॅकेजिंग, डिलिव्हरी इत्यादी
Economies of Scale:
व्यवसायाच्या वाढीसोबत खर्च कमी होणे आणि त्यातून कंपनीला मिळणारा आर्थिक फायदा. प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात बनवल्यास प्रत्येक प्रॉडक्ट च्या मागे येणारा उत्पादन खर्च कमी होतो.
Economies of Scope:
व्यवसायाचा स्कोप वाढवून खर्चात होणारी बचत. नवीन प्रॉडक्ट्स किंवा सेवांची सुरूवात केल्यास, आधीच तयार केलेल्या Marketing आणि Distribution चॅनेल्सचा उपयोग करून खर्च कमी करता येतो

बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!
✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच
बिझनेस मॉडेल ब्लॉग
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत
Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?
Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...