Revenue Streams:

उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?

रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे उत्पन्न. जर ग्राहक हा व्यवसायाचे हृदय असेल, तर रिव्हेन्यू स्ट्रीम्स त्या हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आहेत.

उद्योजकांसाठी आपले टार्गेट कस्टमर कोणत्या व्हॅल्यूसाठी पैसे देत आहेत, हे समजणे अत्यावश्यक आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना, प्रत्येक कस्टमर सेगमेंटमधून कोणत्या रिव्हेन्यू स्ट्रीम्स तयार करता येतील यावर विचार केला जातो. रिव्हेन्यू स्ट्रीम्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे व्हॅल्यू प्रपोजिशन आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना कसे विकू शकता हे ठरवता येते. व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच शाश्वत आणि प्रॉफिटेबल रिव्हेन्यू स्ट्रीम्स तयार करणे कंपनीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.  

व्यवसायात मुख्यतः दोन प्रकारचे रिव्हेन्यू स्ट्रीम्स असतात, एकदाच होणारी विक्री (Transaction Revenues – One-time Payment) आणि नियमित विक्री (Recurring Revenues – Ongoing Payments). या दोन्ही रिव्हेन्यू स्ट्रीम्स तयार करण्यासाठी विविध प्रकारचे Pricing Mechanisms उपलब्ध आहेत.


रिव्हेन्यू स्ट्रीम्स तयार केल्यामुळे मराठी उद्योजकांना मिळणारे 5 प्रमुख फायदे:

 

  1. उत्पनाचे विविध स्रोत शोधता येतात, एका पेक्षा अधिक रिव्हेन्यू स्ट्रीम्स तयार केल्याने रिस्क कमी होते
  2. नियमित उत्पन्नाचे मार्ग सुनिश्चित करता येतात, ज्यामुळे बिझनेस मॉडेल मध्ये व्यवहार्यता येते
  3. प्रॉडक्टची योग्य किंमत ठरवणे सोपे होते, कॅश-फ्लो चा अंदाज बांधता येतो आणि सेल्स प्लॅनिंग करता येते
  4. विक्रीमध्ये वारंवारिता आणता येते; Recurring Revenue Model तयार करता येतो
  5. ग्राहकांद्वारे संपूर्ण कालावधीत मिळणारे उत्पन्न, म्हणजेच Customer Lifetime Value, वाढवता येते


शाश्वत उत्पानांचे स्रोत शोधण्यासाठी हे शोधा:

  1. ग्राहक सध्या काय विकत घेत आहेत? किती किंमत देतात, किती प्रमाणात आणि कुठून विकत घेतात हे शोधा
  2. कोणते प्रॉडक्ट/सर्व्हिसेस तुमच्यासाठी विक्री करण्यास सोईचे आणि प्रॉफीटेबल आहेत हे शोधा
  3. कोणते Customer Segments तुमच्यासाठी जास्त प्रॉफीटेबल आहेत हे शोधा
  4. कोणते Channels भविष्यात स्केलेबल असू शकतात हे शोधा
  5. कोणत्या Revenue Streams जास्त प्रोफीटेबल आणि स्केलेबल आहेत हे शोधा 

Revenue Streams चे प्रकार:

1. Asset Sale: ग्राहकांना फिजिकल किंवा डिजिटल प्रॉडक्ट विकून उत्पन्न मिळवणे

2. Usage Fee: प्रॉडक्ट किंवा सेवांच्या वापरानुसार ग्राहकांकडून शुल्क आकारणे

3. Subscription Fees: ठराविक कालावधीनंतर सेवेसाठी ग्राहकांकडून नियमित शुल्क घेत राहणे

4. Lending/Renting/Leasing: प्रॉडक्ट किंवा सेवा भाड्याने देऊन उत्पन्न मिळवणे

5. Licensing: बौद्धिक संपत्तीच्या वापराचे हक्क ठराविक कालावधीसाठी देऊन उत्पन्न मिळवणे

6. Brokerage Fees: विशिष्ट व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कमिशन किंवा फी स्वरूपात उत्पन्न मिळवणे

7. Advertising: जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणे

दोन प्रकारच्या Revenue Streams:

A. Transaction Revenues (One-time Customer Payment) – ग्राहक एकदाच पैसे देऊन प्रॉडक्ट विकत घेतो 

B. Recurring Revenues (Ongoing Payments) – ग्राहक नियमितपणे, म्हणजे दर महिन्याला किंवा विशिष्ट कालावधीने सेवांची खरेदी करत राहतो


Revenue Streams तयार करण्यासाठी, दोन प्रकारचे Pricing Mechanism:

 

Fixed Pricing: प्रॉडक्टची किंमत त्यात वापरलेल्या घटकांवर आधारित असते

  • List Price: विक्रेत्याने प्रॉडक्टसाठी ठरवलेली किमान आधारभूत किंमत
  • Product Feature Dependent: प्रॉडक्टची किंमत त्याच्या फीचर्स किंवा Value Proposition नुसार ठरवली जाते
  • Customer Segment Dependent: प्रॉडक्टची किंमत ग्राहकांच्या मागणीनुसार किंवा ग्राहक समूहाच्या वैशिष्ट्यांनुसार बदलते
  • Volume Dependent: प्रॉडक्टची किंमत विकत घेतलेल्या प्रमाणानुसार ठरवली जाते

Dynamic Pricing:  प्रॉडक्टची किंमत बाजारातील मागणी आणि परिस्थितीनुसार ठरवली जाते

  • Negotiation (Bargaining): ग्राहक आणि विक्रेत्यादरम्यान चर्चा किंवा सौद्यातून किंमत ठरवली जाते
  • Yield Management: प्रॉडक्टची किंमत उपलब्ध इन्व्हेंटरी आणि विक्रीच्या वेळेनुसार ठरवली जाते
  • Real-Time Market Pricing: बाजारातील वर्तमान पुरवठा आणि मागणीच्या आधारावर किंमत ठरवली जाते
  • Auctions: ग्राहकांच्या प्रतिस्पर्धात्मक बोलीद्वारे प्रॉडक्टची किंमत ठरवली जाते

बिझनेस मॉडेल वर्कशॉप

बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!

✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच

बिझनेस मॉडेल ब्लॉग

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...

read more
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions:  ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...

read more
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....

read more
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...

read more
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...

read more
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...

read more
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...

read more