Customer Relationships:

ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध निर्माण केल्यास ग्राहकांची आपल्या ब्रँडसाठी निष्ठा वाढते, आनंदी ग्राहक तयार होतात, आणि यामुळे दूरगामी व्यावसायिक फायदे मिळतात.

नवीन ग्राहक मिळवण्यासाठी, सध्याच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी, आणि चांगल्या ग्राहक संबंधातून विक्री वाढवण्यासाठी, ग्राहकांसोबत कशा प्रकारचे संबंध तयार करू शकतो हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांसोबत वैयक्तिक संबंध प्रस्थापित करणे तसेच ऑनलाइन चॅनेल्सद्वारे मोठ्या ग्राहक समूहासोबत सततचा संपर्क ठेवणे आवश्यक आहे.

ग्राहकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केल्यास ग्राहक आपल्या ब्रँडची मोफत तोंडी जाहिरात करत राहतात. ग्राहक ब्रँडसोबत कनेक्टेड राहतात, ज्यामुळे लॉयल कस्टमर बेस तयार होतो आणि दीर्घकालीन आर्थिक फायदे मिळतात. जास्तीत जास्त ग्राहकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करून आनंदी ग्राहकांची कम्युनिटी तयार करण्याचा प्रयत्न करा.

कस्टमर रिलेशनशिप्स निश्चित केल्यामुळे मराठी उद्योजकांना मिळणारे 5 मुख्य फायदे: 

  1. ग्राहक चांगल्या संबंधांमुळे प्रामाणिक सल्ले, सूचना देतात, सकारात्मक फीडबॅक मेकॅनिझम तयार करता येते  
  2. ग्राहकांसोबत चांगले संबंध ठेवल्यास ते आपल्या ब्रँडचा स्वतःच्या पद्धतीने विनामूल्य प्रचार आणि प्रसार करतात
  3. नियमित संपर्क ठेवल्यास ग्राहकांच्या बदलत्या गरजा वेळेवर समजून घेता येतात आणि त्यानुसार उत्पादन सुधारता येते
  4. चांगले ग्राहक संबंध तयार केल्यास ग्राहकांना ब्रँडसोबत टिकवून ठेवता येते, ज्यामुळे Customer Lifetime Value वाढते आणि कंपनीचा नफा वाढतो
  5. ग्राहकांना आनंदी ठेवणारे संबंध प्रस्थापित झाल्यास त्यातून व्यवसाय वाढ करणे सोपे होते 

ग्राहकांसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी हे करा:

  1. तुमचे कॉम्पिटिटर ग्राहकांना कशाप्रकारे सपोर्ट आणि सर्व्हिसेस देतात याचा अभ्यास करा 
  2. ग्राहकांना तुमच्या सारख्या ब्रँड कडून कश्या प्रकारची वागणूक अपेक्षित आहे ते शोधा, आपला ब्रँड ते कसा ओळखणार आहेत हे ठरवा
  3. विक्रीनंतर ग्राहकांसोबत संवाद साधा आणि त्यांचे अभिप्राय, तक्रारी, आणि सूचना नियमितपणे जाणून घेण्यासाठी फीडबॅक मेकॅनिझम तयार करा
  4. निर्णयप्रक्रियेत ग्राहकांचे हित कसे केंद्रस्थानी ठेवता येईल हे तपासा
  5. जुन्या ग्राहकांकडून संभाव्य ग्राहकांचे रेफरल कसे मिळवता येतील हे शोधा

कस्टमर रिलेशनशिप चे प्रकार:

1. Personal Assistance – ग्राहकांना वैयक्तिक सपोर्ट देणे
जसे की: In-store support, Call, Email, WhatsApp Support, Live Chat

2. Dedicated Personal Assistance – ग्राहकासाठी नेहमी उपलब्ध असणारा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर
जसे की: Key Account Managers, Relationship Manager

3. Self-Service – ग्राहकांना स्वतःच्या पातळीवर उपलब्ध होणारी मदत
जसे की: Online FAQs, Tutorials, Self-checkout systems, Knowledge Hub


4. Automated Services – ग्राहकाच्या पसंतीनुसार देण्यात येणारी स्वयंचलित ग्राहक सेवा
जसे की: Personalized Online Profiles, Automated Recommendations, Email Automation, Virtual Assistants, IVR, Dynamic Pricing Engines


5. Communities – ग्राहकांच्या कम्युनिटी मधून परस्परांची होणारी मदत
जसे की: Online forums, Facebook Groups, WhatsApp Groups, Support Communities, Meetup Groups


6. Co-Creation – ग्राहकांच्या सहभागातून निर्माण केलेली संसाधने
जसे की: Customer reviews, User-generated content, Crowdsourcing, Beta testing

बिझनेस मॉडेल वर्कशॉप

बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!

✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच

बिझनेस मॉडेल ब्लॉग

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...

read more
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions:  ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...

read more
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....

read more
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...

read more
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...

read more
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...

read more