Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?
चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते. व्यवसायात मुख्यतः कम्युनिकेशन, डिस्ट्रिब्युशन आणि सेल्स हे तीन प्रमुख चॅनेल्स असतात. हे चॅनेल्स ऑफलाइन (दुकान) किंवा ऑनलाइन (वेबसाईट, सोशल मीडिया) अशा विविध स्वरूपात असू शकतात.
ग्राहकांपर्यंत तुमचा ब्रँड पोहोचावा, त्यांना तुमच्या प्रॉडक्टचे फायदे समजावेत, त्यांना प्रॉडक्ट सहज खरेदी करता यावे, आणि विकत घेतलेले प्रॉडक्ट त्यांना वेळेवर मिळावे यासाठी विविध चॅनेल्स आवश्यक ठरतात.
योग्य चॅनेल्स वापरल्यास, तुमचं व्हॅल्यू प्रपोजीशन अधिक प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. ग्राहकांच्या पसंतीच्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्या कस्टमर एक्सपीरियंस मध्ये सुधारणा होऊ शकते. बिझनेस मॉडेल बनवण्यासाठी ग्राहकांच्या पसंती अनुसार परंतु तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांना साजेशा आणि परवडणाऱ्या चॅनेल्सचा विचार करणे गरजेचे आहे.
योग्य चॅनेल्स तयार केल्यामुळे मराठी उद्योजकांना मिळणारे 5 मुख्य फायदे:
- ग्राहकांच्या आवडीच्या चॅनेल्सद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास ग्राहक अनुभव (कस्टमर एक्सपीरियंस) सुधारतो आणि ग्राहकांची एन्गेजमेंट वाढते
- प्रभावी डिस्ट्रिब्युशन चॅनेल्स निवडल्यास ग्राहकांपर्यंत कमी खर्चात आणि जलद पोहोचता येते
- योग्य सेल्स चॅनेल्स तयार केल्यास ग्राहकांसाठी प्रॉडक्ट खरेदी करणे सुलभ होते, ज्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढ होते
- चांगले कम्युनिकेशन चॅनेल्स तयार केल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी, प्रतिक्रिया आणि सूचना मिळतात, ज्यामुळे प्रॉडक्ट आणि प्रोसेसमध्ये वेळेवर आवश्यक ते बदल करता येतात
- योग्य चॅनेल मिक्स तयार केल्याने भविष्यातील व्यवसाय विस्ताराची दिशा ठरवणे सोपे होते
तुमच्या व्यवसायासाठी योग्य Distribution & Sales चॅनेल्स निवडण्यासाठी हे करा:- तुमचे स्पर्धक सध्या कोणत्या सेल्स चॅनेल्सद्वारे त्यांच्या उत्पादनांची विक्री करत आहेत हे तपासा
- तुमच्या इंडस्ट्री मधील प्रोफीटेबल आणि स्केलेबल सेल्स चॅनेल कोणते आहेत हे तपासा
- कोणत्या सेल्स चॅनेल्समधून CAC – Customer Acquisition Cost सगळ्यात कमी होऊ शकते हे अभ्यासा
- कोणत्या सेल्स चॅनेल्समधून ग्राहकांचे LTV – Lifetime Value जास्त असू शकते हे तपासा
- तुमच्या कस्टमर च्या Journey अनुसार चॅनेल्स कसे निवडता येतील ते पाहा (Customer Journey: Awareness, Consideration, Conversion)
चॅनेल्स चे प्रकार:
1. Awareness – ब्रँड प्रबोधन करणारे चॅनेल्स: ग्राहकांना आपला ब्रँड कसा आणि कुठून माहित होतो?
Awareness Channels | |
Owned | Facebook, Instagram, YouTube, SEO Blogs, SEM |
Partner | Influencer Partnerships, PR News, Events |
2. Evaluation – ग्राहकांना उत्पादनाची माहिती देणारे चॅनेल्स: ग्राहकांना आपले Value Proposition कशा प्रकारे माहिती होते
Evaluation Channels | |
Owned | Website, Mobile App, Free Trials, Google Review, Webinar, Testimonials In-Store Demos |
Partner | Content Marketing Blogs, Marketplace Reviews, Influencer Reviews |
3. Purchase – उत्पादन विक्रीसाठी चॅनेल्स: ग्राहक आपले उत्पादन कुठे आणि कसे विकत घेतील?
Purchase Channels | |
Owned | Ecommerce Website, Mobile App, Sales Team, Telecalling |
Partner | Marketplace, Affiliate Program, Retailers, Resellers, Events, |
4. Delivery – ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्याचे चॅनेल्स: ग्राहकांना आपण कशा प्रकारे आपले Value Proposition वितरित करतो?
Delivery Channels | |
Owned | In House Delivery Fleet |
Partner | Logistics Partners, Third-Party Logistics Providers |
5. After Sales – विक्री पश्चात ग्राहकांना मदत करणारे चॅनेल्स: विक्री नंतर आपण ग्राहकांना ब्रँडसोबत कसे जोडून ठेवतो?
After Sales Channels | |
Owned | WhatsApp Business, Phone/Emai Support, Surveys, Loyalty Programs |
Partner | Third-Party Service Providers, In-stores Support |

बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!
✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच
बिझनेस मॉडेल ब्लॉग
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत
Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?
Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन
Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...