Value Propositions:
ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?
व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे ग्राहकांना मिळणारे विशेष फायदे आणि मूल्य. तुमचे व्हॅल्यू प्रपोजीशन स्पष्ट असेल तर तुमच्या ग्राहकांना हे समजते की तुम्ही त्यांना कोणते फायदे देणार आहात, त्यांच्या कोणत्या समस्यांचे समाधान करणार आहात आणि तुमचे प्रॉडक्ट/सर्व्हिस बाजारातील इतर उपलब्ध पर्यायांपेक्षा कसे वेगळे आहेत.
व्हॅल्यू प्रपोजीशन तयार केल्याने, ग्राहकांनी आपलेच प्रॉडक्ट का विकत घ्यावे, स्पर्धकांच्या प्रॉडक्ट ऐवजी आपलेच प्रॉडक्ट का निवडावे हा उद्योजकांना नेहमी पडणारा मूलभूत प्रश्न सोडवता येतो. ग्राहकांना मिळणारे मूल्य ठरवण्यासाठी, आपल्या प्रॉडक्ट मध्ये कॉम्पिटिशन पेक्षा वेगळे आणि ग्राहकांसाठी उपयोगी असे कोणते फीचर्स आहेत? कॉम्पिटिटर सध्या देत नाहीत असे कोणते विशिष्ट फायदे ग्राहकांना मिळणार आहेत हे शोधणे गरजेचे आहे.
चांगले व्हॅल्यू प्रपोजीशन तयार केल्याने तुमचे मार्केटमधील इतर स्पर्धकांपेक्षा असलेले वेगळेपण उठून दिसेल, ज्याने तुमच्या ब्रँडचे पोजिशनिंग करणे सोपे होईल. ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यांचा विचार केल्यामुळे ग्राहक तुमच्या ब्रँड सोबत चांगल्या पद्धतीने जोडले जातील आणि त्यातून निष्ठावंत ग्राहक निर्माण होतील. स्पष्ट व्हॅल्यू प्रपोजीशन तयार केल्यामुळे ग्राहकांना नेमके काय पाहिजे हे ठरवता येते आणि त्यानुसार काम करणे उद्योजकांसाठी सोपे होते.
व्हॅल्यू प्रपोजीशन तयार केल्याने मराठी उद्योजकांना मिळणारे 5 मुख्य फायदे:
- ग्राहकांना सर्वात जास्त फायदा देणारे, ग्राहक केंद्रित प्रॉडक्ट/सर्व्हिसेस तयार करणे सोपे होते
- मार्केट मधील कॉम्पिटिशन पेक्षा वेगळेपण तयार करता येते, स्पर्धेत टिकणारा सर्वोत्तम ब्रँड तयार करता येतो
- मार्केटिंग कम्युनिकेशन तयार करणे सोपे होते, ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स तयार करता येतात
- नेमके व्हॅल्यू प्रपोजीशन तयार केल्याने उद्योजकांचा काम करण्याचा फोकस क्लिअर होतो
- ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे व्हॅल्यू प्रपोजीशन तयार केल्याने निष्ठावंत कस्टमर तयार होतात
Value Propositions ठरवताना खालील गोष्टी लक्षात घ्या:
- कॉम्पिटिटर ग्राहकांना नेमके कोणते सोल्युशन, Values देत आहेत याचे Competitive Analysis करा
- ग्राहक शोधत असलेल्या आदर्श प्रॉडक्ट/सर्व्हिसेस मधील Key Features कोणते आहेत ते शोधा
- ग्राहकांना तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेस मधून मिळणारे मुख्य फायदे, Values काय आहेत ते ठरवा
- कॉम्पिटिशन पेक्षा वेगळे आणि आकर्षक असे तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेस चे किमान 5 USP (Unique Selling Points) ठरवा
- आपण ग्राहकांना कॉम्पिटिशन पेक्षा चांगले प्रॉडक्ट कसे देऊ शकतो हे तपासा – SWOT Analysis करा
तुमच्या ग्राहकांसाठी योग्य Value निवडा:
1. नावीन्यता (Newness): नवीन तंत्रज्ञानावर आधारित बाजारात प्रथमच सादर केलेले उत्पादन
2. उत्तम परफॉर्मन्स (Performance): कॉम्पिटिटर च्या प्रॉडक्ट पेक्षा उत्तम गुणवत्ता असणारे आणि समान किंमतीत ग्राहकांसाठी अधिक परिणाम साधणारे प्रॉडक्ट
3. कस्टमायझेशन (Customization): ग्राहकांच्या आवडीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेले खरेदीचे पर्याय
4. गरजा जलदरीतीने पूर्ण करणारे प्रॉडक्ट (Getting the Job Done): ग्राहकांच्या नेमक्या गरजा जलदरीतीने पूर्ण करणारे परिणामकारक प्रॉडक्ट
5. चांगले प्रॉडक्ट डिझाईन (Design): ग्राहकांचा प्रॉडक्ट वापरण्याचा अनुभव (User Experience) सुधारणारे डिझाईन
6. ब्रँड स्टेटस (Brand/Status): ग्राहकांची प्रतिमा उंचावणारे प्रॉडक्ट/ब्रँड
7. कमी किंमत (Price): स्पर्धकांच्या उत्पादनासारखे, पण कमी किमतीत उपलब्ध असलेले उत्पादन
8. खर्च कपात (Cost Reduction): नाविन्यपूर्ण उत्पादनाद्वारे ग्राहकांची बचत करणे
9. कमी रिस्क (Risk Reduction): ग्राहकांचे नुकसान कमी करणारे प्रॉडक्ट
10. प्रॉडक्ट ची उपलब्धता (Accessibility): ग्राहकांना सहजपणे खरेदी करता येईल असे उपलब्ध करून दिलेले उत्पादन
11. प्रॉडक्ट ची उपयोगिता (Convenience/Usability): ग्राहकांना वापरण्यास सोपे आणि उपयुक्त उत्पादन

बिझनेस मॉडेल वर्कशॉप
बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!
✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच
बिझनेस मॉडेल ब्लॉग
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?
Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत
Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?
Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन
Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...