Customer Segments:

तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ?

कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही नेमके कोणाच्या समस्या सोडवत आहात आणि कुणासाठी प्रॉडक्ट/सर्व्हिसेस बनवत आहात याचा ठोस अंदाज येतो.

ग्राहकांच्या विशिष्ट समस्या, गरजा, प्रॉडक्ट वापरण्यासंबंधीचे वर्तन, आर्थिक क्षमता आणि डेमोग्राफिक्स इत्यादी घटकांचा विचार करून ग्राहकांची वर्गवारी करता येते. यामुळे तुमचे आदर्श ग्राहक समूह ओळखणे सोपे होते. नेमक्या गरजा असलेल्या ग्राहकांचे योग्य समूह तयार केल्यास तुमच्या कंपनीला त्यांच्या पर्यंत पोहोचणे सोपे होते.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यवसायाला स्वतःचा बिझनेस मॉडेल तयार करणे आवश्यक आहे. कस्टमर सेगमेंट्स तयार करून, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून बिझनेस मॉडेलकडे पाहिल्यास, उद्योजक म्हणून तुम्हाला नेमके काय करणे गरजेचे आहे हे स्पष्ट होते.

कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने, ग्राहकांच्या गरजा आणि आवडी प्रॉडक्ट निर्मितीप्रक्रियेत केंद्रस्थानी राहतात, ज्यामुळे ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन विकसित होतो.

कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने मराठी उद्योजकांना मिळणारे 5 मुख्य फायदे:

  1. कोणते ग्राहक पैसे देऊ शकतील याबद्दलचा संभ्रम दूर होतो, आणि कोणते ग्राहक फायदेशीर आहेत हे स्पष्ट होते
  2. नेमके ग्राहक ओळखल्याने सुरुवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या मर्यादित संसाधनांचा योग्य वापर करता येतो
  3. ग्राहकांच्या समस्या आणि गरजा समजून घेतल्याने, त्यांच्या आवश्यकतांनुसार प्रॉडक्ट बनवणे शक्य होते
  4. टार्गेट कस्टमर माहिती असल्यामुळे अचूक मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करता येतात
  5. ग्राहकांचे हित केंद्रस्थानी ठेवणारे, ग्राहक-केंद्रित व्यावसायिक निर्णय घेणे शक्य होते

आदर्श ग्राहक शोधण्यासाठी हे करा:

  1. ग्राहकांचे प्रॉब्लेम समजून घ्या, त्यांचे Pain Point काय आहेत ते जाणून घ्या
  2. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यांची वर्गवारी (Segments) तयार करा
  3. तुमच्या इंडस्ट्री मधील सगळ्यात Profitable कस्टमर सेगमेंट कोणते आहेत ते शोधा
  4. ग्राहकांच्या सेगमेंट्स नुसार त्यांचे डेमोग्राफिक्स अभ्यासा (Age, Gender, Income, Location, Education)
  5. तुमच्या आदर्श ग्राहकाचा Buyer Persona बनवा

कस्टमर सेगमेंट्स चे प्रकार:

  • Mass Market:

मास मार्केटला टार्गेट करणारे बिझनेस ग्राहकांची वर्गवारी करत नाहीत. Value Propositions, Distribution Channels आणि Customer Relationships हे सर्व एकाच मोठ्या ग्राहक समूहासाठी केंद्रित ठेवले जातात, मास मार्केट मध्ये ग्राहकांचे प्रश्न आणि गरजा एकसमान असतात.

  • Niche Market:

Niche Market मध्ये बिझनेस, विशिष्ट कस्टमर सेगमेंटला टार्गेट करतात. Value Propositions, Distribution Channels आणि Customer Relationships हे ग्राहकांच्या विशिष्ट गरजेनुसार बदलतात. या बिझनेस मॉडेलमध्ये ग्राहकांचे खास प्रॉब्लेम सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.

  • Segmented:

Segmented Market मध्ये एकाच मार्केटमधील परंतु किंचित भिन्न गरजा असलेल्या वेगवेगळ्या ग्राहक समूहांना टार्गेट केले जाते. जसे की, Healthcare Sector मध्ये वृद्ध आणि तरुणांच्या वैद्यकीय गरजा वेगवेगळ्या असू शकतात. Value Propositions बदलू शकते, पण Distribution Channels आणि Customer Relationships समान ठेवले जाऊ शकतात.

  • Diversified:

Diversified Market मध्ये पूर्णपणे वेगळ्या गरजा असलेल्या ग्राहक समूहांना टार्गेट केले जाते. प्रत्येक समुहानुसार Value Propositions, Distribution Channels आणि Customer Relationships वेगळे तयार करावे लागते.

  • Multi-Sided Platforms:

Multi-Sided Platforms असे बिझनेस मॉडेल आहेत जे विविध ग्राहक समूहांना एकत्रित सेवा देतात. जसे की, वर्तमानपत्रासाठी जाहिरात करणारे आणि वाचक हे दोघेही ग्राहक असतात.

आदर्श ग्राहकाचा Buyer Persona कसा तयार करायचा?

बिझनेस ते कस्टमर (B2C) मॉडेल साठी Buyer Persona:

  • Age (up to 18, 18-24, 25-34, 35-44, 45+)
  • Gender (Male/Female)
  • Monthly Income (up to 25k, 25k to 50k, 50k to 1 Lac, 1 Lac +)
  • Location (Urban/Semi Urban/Rural)
  • Education Level (up to 12th, Graduation)
  • Occupation (Salaried/Self Employed)
  • Pain Points and Challenges
  • Buying Behaviour and Process
  • Budget
  • Communication Channels

बिझनेस ते बिझनेस (B2B) मॉडेल साठी ICP – Ideal Client Profile:

  • Industry
  • Company Size – No. of Employees
  • Annual revenue
  • Location – Regions or Markets
  • Buying Committee
  • Budget

बिझनेस मॉडेल वर्कशॉप

बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!

✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच

बिझनेस मॉडेल ब्लॉग

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions:  ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...

read more
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....

read more
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...

read more
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...

read more
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...

read more
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...

read more