बिझनेस मॉडेल चे

6 मुख्य पॅटर्न्स

बिझनेस मॉडेल कॅनव्हासमधील 9 बिझनेस ब्लॉक्सना विशिष्ट पद्धतीने एकत्र करून बिझनेस मॉडेल पॅटर्न तयार केला जातो. Alexander Osterwalder ने त्याच्या बिझनेस मॉडेल कॅनव्हास द्वारे असे 6 मुख्य बिझनेस मॉडेल पॅटर्न्स सांगितलेले आहेत.

तुमच्या स्टार्टअपला लागू होणारा योग्य बिझनेस मॉडेल पॅटर्न शोधल्यास, तुम्हाला स्पर्धेत टिकणारा व्यवसाय निर्माण करणे सोपे होईल. तुमच्या व्यवसायासाठी योग्य स्टार्टअप स्ट्रॅटेजी ठरवणे सोपे होईल, तुम्हाला तुमच्या बिझनेसचा स्कोप स्पष्ट होईल, आणि त्यानुसार तुम्ही बिझनेस मॉडेलमध्ये बदल आणि सुधार करू शकता.

हे 6 पॅटर्न्स सर्व प्रकारच्या स्टार्टअप्सना लागू पडू शकतात, तसेच या पॅटर्न्स व्यतिरिक्त अजून इतर नाविन्यपूर्ण बिझनेस मॉडेल पॅटर्न्स देखील तयार केले जाऊ शकतात. 

6 मुख्य पॅटर्न्स:

1. Unbundling Model: 

या बिझनेस मॉडेल पॅटर्नमध्ये कस्टमर रिलेशनशिप, प्रॉडक्ट इनोव्हेशन, आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे तिघे घटक स्वतंत्रपणे मॅनेज केले जातात, ज्यामुळे प्रत्येक घटकावर अधिक लक्ष देऊन त्यांची कार्यक्षमता सुधारता येते.

उदाहरणार्थ: ‘भारती एरटेल’ त्यांचे टॉवर हे ‘इंडस टॉवर्स’ या कंपनी द्वारे मॅनेज करते आणि हे त्यांच्या मुख्य टेलिकॉम व्यवसायापासून वेगळे (unbundled) ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून एअरटेल कंपनी ग्राहकांवर जास्त फोकस करू शकते.

2. Long Tail Model:

या बिझनेस मॉडेल पॅटर्न मध्ये तुलनेने कमी मागणी असलेले परंतु विशिष्ट गरजांसाठी लागणारे खास (Niche) प्रॉडक्ट्स हे मोठ्या व्हरायटी, रेंज मध्ये मध्ये उपलब्ध करून दिले जातात. जेणेकरून अशा वेगवेगळ्या खास प्रॉडक्ट चे एकत्रित विक्री मूल्य हे नेहमी वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्स च्या विक्रीपेक्षा जास्त असेल. खास (Niche) प्रॉडक्ट्स वर फोकस केल्याने इन्व्हेंटरी मोठ्या प्रमाणात ठेवण्याची गरज भासत नाही, मार्केट मधील गरजेनुसार लागलीच प्रॉडक्ट बदलले जाऊ शकतात. 

उदाहरणार्थ: ‘गोदरेज नेचर बास्केट’ त्यांच्या प्रीमियम ग्रोसरी दुकानांमध्ये कमी मागणी असलेले, पण अन्यत्र सहज उपलब्ध नसलेले इंपोर्टेड चीज, वाईन आणि इतर खाद्य पदार्थ विकतात. ग्राहक असे प्रॉडक्ट कमी विकत घेतात परंतु त्यांची किंमत जास्त असल्याने त्यांचे एकत्रित विक्री मूल्य दैनंदिन ग्रोसरी खरेदी पेक्षा जास्त असते.  

3. Multi-Sided Platform (MSP):

या बिझनेस मॉडेल पॅटर्नमध्ये, प्लॅटफॉर्मद्वारे दोन भिन्न ग्राहक समूहांना एकत्र जोडून मूल्य निर्माण केले जाते, अशा प्लॅटफॉर्म वर नवीन यूजर्स वाढतील तसे प्लॅटफॉर्म चे मूल्य वाढते. 

उदाहरणार्थ: ‘ओला’ हे ड्रायव्हर्स आणि पॅसेंजर्स या दोन्ही भिन्न ग्राहक समूहांना एकाच प्लॅटफॉर्म द्वारे जोडते. ग्राहक ओला प्लॅटफॉर्म द्वारे कॅब सर्व्हिस वापरतात आणि ड्रायव्हर्स ओला प्लॅटफॉर्म चा उपयोग करून व्यवसाय करतात. प्लॅटफॉर्म वर ग्राहक आणि ड्रायव्हर्स या दोघांची संख्या वाढली तरच प्लॅटफॉर्म मोठा होऊ शकतो.  

4. Freemium Model: 

या बिझनेस मॉडेल पॅटर्नमध्ये, बेसिक सर्व्हिसेस मोफत दिल्या जातात, ज्यामुळे अनेक नवीन ग्राहक आकर्षित होतात. या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार प्रीमियम फिचर विकले जातात, आणि त्यातून नफा कमवला जातो.

उदाहरणार्थ: ‘हॉटस्टार’ हे फ्री मध्ये ग्राहकांसाठी क्रिकेट स्ट्रीम करते परंतु मुव्ही आणि बाकीचे प्रीमियम शो साठी अधिकचे पैसे आकारते 

5. Bait & Hook Model: 

या बिझनेस मॉडेल पॅटर्नमध्ये सुरुवातीला प्रॉडक्ट मोफत किंवा कमी किमतीत दिले जातात (the bait), आणि नंतर त्या संबंधित अधिक महागडे प्रॉडक्ट्स विकून जास्त नफा कमवला जातो (the hook). 

उदाहरणार्थ: ‘रिलायन्स जियो’ ने सुरुवातीला मोफत डेटा (bait) देऊन अनेक नवीन ग्राहकांना जोडले आणि नंतर या ग्राहकांना पेड डेटा पॅक, ऍप सबस्क्रिप्शन द्वारे अधिक किमतीच्या(hook) सर्व्हिसेस देऊ केल्या. 

6. Subscription Model: 

या बिझनेस मॉडेल पॅटर्नमध्ये, ग्राहक नियमितपणे दर महिन्याला किंवा वर्षाला ठराविक रक्कम देऊन सेवांचा लाभ घेतात. या पॅटर्न मध्ये दीर्घकाळासाठी ग्राहकांसोबत चांगले संबंध तयार करणे गरजेचे आहेत जेणेकरून नियमित उत्पन्न मिळण्याची शाश्वती वाढू शकते.  

उदाहरणार्थ: नेटफ्लिक्स दर महिन्याला ग्राहकांकडून ठराविक रक्कम घेऊन आपला स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरू देते. 

बिझनेस मॉडेल वर्कशॉप

बिझनेस मॉडेल तयार केल्याने आपल्या व्यवसायाची दिशा स्पष्ट होते, बिझनेस प्लॅनिंग करणे सहज सोपे होते!

✅ 2500+ उद्योजकांची हजेरी
✅ 8 तासांचा मुद्देसूद वर्कशॉप
✅ 20 वर्ष अनुभवी बिझनेस कोच

बिझनेस मॉडेल ब्लॉग

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत?

Customer Segments: तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत ? कस्टमर सेगमेंट्स म्हणजे तुमच्या आदर्श ग्राहकांचे विशिष्ट समूह, ज्यांची वर्गवारी त्यांच्या गरजांनुसार केली जाते. कस्टमर सेगमेंट्स तयार केल्याने तुम्ही...

read more
Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions: ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे?

Value Propositions:  ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट कसे बनवायचे ?व्हॅल्यू प्रपोजीशन म्हणजेच ग्राहकांनी तुमचेच प्रॉडक्ट का निवडावे याचे स्पष्ट कारण. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे...

read more
Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?

Channels: ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे?चॅनेल्स म्हणजे तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे विविध माध्यम, ज्यामुळे ग्राहकांना तुमच्या ब्रँडची, व्हॅल्यू प्रपोजीशनची आणि प्रॉडक्टची माहिती मिळते....

read more
Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?

Customer Relationships: ग्राहकांसोबत चांगले संबंध कसे तयार करायचे?कस्टमर रिलेशनशिप्स म्हणजेच ग्राहकांसोबत तयार केलेले व्यावसायिक संबंध. व्यवसायात ग्राहकांचा आदर करून त्यांच्याशी सन्मानजनक संबंध...

read more
Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Key Resources: रिसोर्स कसे उपलब्ध करायचे?

Revenue Streams: उत्पानांचे स्रोत कसे तयार करायचे ?रिव्हेन्यू स्ट्रीम्स म्हणजे व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत. प्रत्येक कस्टमर सेगमेंट कडून तुमच्या प्रॉडक्ट/सर्व्हिसेसच्या विक्रीद्वारे मिळणारे...

read more
Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities: बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत

Key Activities -बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेतKey Activities म्हणजे तुमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्रिया. या क्रियांच्या माध्यमातून तुम्ही...

read more
Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships: कोणासोबत पार्टनरशिप करावी?

Key Partnerships - पार्टनरशिप कोणासोबत करावी?Key Partnerships म्हणजेच व्यवसाय वाढविण्यासाठी तयार केलेले धोरणात्मक संबंध आणि भागीदारी. या पार्टनरशिप्सचा उद्देश व्यवसाय मॉडेल अधिक सक्षम करणे, रिस्क...

read more
Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure: व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन

Cost Structure - व्यवसायातील खर्चाचे व्यवस्थापन कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजेच बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी येणारा खर्च, व्हॅल्यू प्रपोजिशन तयार करण्यासाठी आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे...

read more