बिझनेस मॉडेल कॅनव्हास Vs. बिझनेस मॉडेल

उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी त्याच्या व्यवसायातील सर्व घटक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्राहक शोधणे, त्यांच्यासाठी योग्य प्रॉडक्ट तयार करणे, आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणे या सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणि त्या एकाच दृष्टीक्षेपात पाहण्यासाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हास खूप उपयुक्त ठरतो.

पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना सर्वसमावेशक व्यावसायिक दृष्टिकोन मिळवून देण्यासाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे एक उत्तम स्ट्रॅटेजी टूल आहे.

परंतु, या कॅनव्हासचा उद्देश केवळ प्रारंभिक बिझनेस मॉडेल तयार करणे नसून, उद्योजकाचा व्यवसाय यशस्वीपणे घडवण्याचा प्रवास सोपा करणे हा आहे.

मार्केटमधील बदलत्या परिस्थितींनुसार व्यवसायात सातत्याने सुधारणा आणि नवकल्पना करत राहण्याच्या प्रक्रियेला “बिझनेस मॉडेल” असे म्हणतात. बाजारातील बदल, ग्राहकांच्या अपेक्षांमधील बदल, आणि नवीन संधींचा विचार करून बिझनेस मॉडेलमध्ये वेळोवेळी सुधारणा करणे आवश्यक आहे.

बिझनेस मॉडेल कॅनव्हास वापरून तुम्ही व्यवसायाचे एक प्रारंभिक मॉडेल तयार करू शकता आणि वेळोवेळी त्यात सुधारणा करू शकता.

कॅनव्हास ही केवळ एक वेळची क्रिया नसून, बदलत्या बाजारातील परिस्थितीनुसार व्यवसाय सतत सुधारत नेण्याचे एक साधन आहे. 

बिझनेस मॉडेल कॅनव्हास मधील कस्टमर सेगमेंट, व्हॅल्यू प्रपोजीशन, आणि चॅनेल्स या तीन मुख्य ब्लॉक्सच्या आधारे, तुम्ही व्यवसायात नवनवीन प्रयोग करू शकता, नवीन संधी शोधू शकता, आणि त्यातून व्यवसायात नाविन्यता आणू शकता. बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे बिझनेस मॉडेलिंग करण्यासाठी एक प्रमाणित आणि मान्यताप्राप्त टूल आहे.

बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी ‘बिझनेस मॉडेल कॅनव्हास’ चा कसा उपयोग होतो?

1. बिझनेस मॉडेल कॅनव्हास द्वारे व्यवसायाला एकाच दृष्टीक्षेपात, दृश्यात्मक स्वरूपात बघता येते:  

बिझनेस मॉडेल कॅनव्हास द्वारे तुम्ही व्यवसायातील सर्व बिझनेस ब्लॉक्स एकाच दृष्टीक्षेपात बघू शकता आणि नेमक्या कोणत्या बिझनेस ब्लॉकमध्ये इनोव्हेशन करता येऊ शकते याच्या शक्यता शोधू शकता. नवीन व्यावसायिक संधीचा शोध घेण्यासाठी, नाविन्यपूर्ण बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हास महत्वाचे ठरते.  

2. बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग करून योग्य व्यावसायिक प्रयोग करता येतात:  

आपल्या व्यवसायातील कस्टमर सेगमेंट, व्हॅल्यू प्रपोजीशन, चॅनेल्स आणि रिव्हेन्यू स्ट्रीम्स हे बिझनेस ब्लॉक्स समजून घेतल्याने योग्य दिशेला जाणारे, फायदेशीर असे नेमके व्यावसायिक प्रयोग करणे सोपे होते. 

3. बिझनेस मॉडेल कॅनव्हास बनवल्याने उद्योजकांमध्ये वेगवान आणि अचूक निर्णयक्षमता वाढीस लागते:  

बिझनेस मॉडेल कॅनव्हास द्वारे ग्राहकांच्या बदलत्या मागण्या, बाजारातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेणे सोपे होते आणि नवनवीन व्यावसायिक संधीचा शोध घेता येतो. बिझनेस मॉडेल कॅनव्हास मधील 9 बिझनेस ब्लॉक्स शिकल्याने उद्योजकाला त्याच्या व्यवसायाचा सगळ्या बाजूंनी आढावा घेता येतो आणि त्यामुळे योग्य व्यावसायिक निर्णय घेणे सोपे होते.  

स्टार्टअप महाराष्ट्र मेम्बरशिप

स्टार्टअप फंडिंग प्रोसेस शिका

बिझनेस मॉडेल आणि फंडिंग प्रोसेस विषयी सुलभ मराठी मध्ये शिका

मेम्बर ओन्ली इव्हेंट्स 

मेम्बर साठी खास आयोजित करण्यात येणाऱ्या इव्हेंट्स मध्ये सहभाग

१ वर्षभर मेंटॉर सपोर्ट मिळवा

दर आठवड्याला स्टार्टअप मेंटॉर्स सोबत भेटा आणि फंडिंग प्रोसेस शिका

 50+ मीटअप नेटवर्किंग इव्हेंट्स

मेंबरशिप द्वारे स्टार्टअप महाराष्ट्र आयोजित 50 पेक्षा अधिक नेटवर्किंग इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा!

सुरु तर करा
सोबत आहोत !

स्टार्टअप महाराष्ट्र द्वारे आयोजित मीटअप इव्हेंट्स मध्ये सहभागी व्हा आणि स्टार्टअप फंडिंग प्रोसेस विषयी मराठी मध्ये शिका

Register for Free Membership

You have successfully Registered!