बिझनेस मॉडेल कॅनव्हास काय आहे ?

बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे एक प्रभावी स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट टूल आहे, ज्याद्वारे संपूर्ण व्यवसायाचे चित्रण एकाच दृष्टीक्षेपात करता येते. व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी गरजेचे, महत्वाचे घटक कोणते आहेत आणि ते एकत्रित कसे कार्य करतील हे ठरवण्यासाठी बिझनेस मॉडेल तयार केले जाते.
हे टूल तुम्हाला तुमच्या व्यवसायाची संपूर्ण कल्पना एका पानावर दृश्यात्मक स्वरूपात दाखवते. Alexander Osterwalder यांनी हे टूल सोप्या आणि दृश्यात्मक पद्धतीने बिझनेस मॉडेल मांडण्यासाठी विकसित केले आहे.
बिझनेस मॉडेल कॅनव्हास मध्ये ‘9 बिझनेस ब्लॉक्स’ (व्यावसायिक घटक) दिलेले आहेत जे पुढील प्रमाणे आहेत:
- Customer Segments – तुमचे आदर्श ग्राहक कोण आहेत
- Value Propositions – ग्राहकांना मिळणारे मूल्य, फायदे, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस
- Channels – ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग
- Customer Relationships – ग्राहकांसोबतचे नातेसंबंध
- Revenue Streams – उत्पन्नाचे स्रोत
- Key Resources – आर्थिक, भौतिक आणि बौद्धिक संसाधने
- Key Activities – व्यावसायिक ऍक्टिव्हिटी, हालचाली
- Key Partnerships – पार्टनर्स, सप्लायर्स
- Cost Structure – खर्चाचे व्यवस्थापन
बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे फक्त एक पानाचे स्ट्रॅटेजी टूल आहे, ज्यामध्ये महत्वाचे 9 बिझनेस ब्लॉक्स दिलेले आहेत. परंतु या एक पानाच्या टूल मध्ये व्यवसायातील सर्व महत्वाच्या बाबी अंतर्भूत आहेत.
- या कॅनव्हासच्या मदतीने तुम्ही तुमच्या नवीन स्टार्टअप आयडिया किती सुसंगत आहे हे ठरवू शकता.
- या टूलद्वारे स्टार्टअप आयडिया ला दृश्यात्मक स्वरूपात (Visual Representation) मांडता येते, ज्यामुळे आयडिया चे विश्लेषण आणि व्हॅलिडेशन करणे सुलभ होते.
- तुमच्या स्टार्टअप चे बिझनेस मॉडेल बनवण्यासोबतच आइडिया व्हॅलिडेशन साठी सुद्धा बिझनेस मॉडेल कॅनव्हास चा उपयोग केला जाऊ शकतो.
- हे टूल वापरून तुम्ही ग्राहकांच्या सध्याच्या आणि बदलणाऱ्या गरजा समजू शकता, आणि स्पर्धकांपेक्षा चांगले प्रॉडक्ट विकसित करू शकता. तुम्हाला आवश्यक असलेले रिसोर्सेस, पार्टनर्स आणि सप्लायर्स कोण आहेत हे समजून घेऊ शकता.
- तसेच, व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येईल आणि किती उत्पन्न मिळवता येईल याचा अंदाज देखील तुम्ही या कॅनव्हासच्या मदतीने लावू शकता.
पुणे स्टार्टअप मीटअप
पुणे स्टार्टअप मीटअप हा पुणे येथे प्रत्येक महिन्याला होणारा स्टार्टअप नेटवर्किंग इव्हेन्ट आहे. या मीटअप इव्हेन्ट द्वारे आपण 50+ स्टार्टअप फाउंडर्स ना भेटू शकता आणि त्यांच्या सोबत नेटवर्किंग करू शकता